Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भव्य रोड शो; सर्वसामान्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी (BJP) महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराच्या सांगता फेरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. ही प्रचार फेरीची सुरुवात समता भूमी येथून होऊन, मतदार संघाच्या बहुतांश भागातून जाऊन लाल महाल येथे सांगता झाली. या संपूर्ण मार्गावर मतदार नागरिकांनी अभूतपूर्व उत्साहामध्ये यात्रेचे स्वागत केले. जागोजागी मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेक चौकांमध्ये हेमंत रासने (Hemant Rasane) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना महिलांनी औक्षण केले. फेरीची सभेने सांगता झाली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

उमेदवार हेमंत रासने, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), मंत्री उदय सामंत (Uday Samant), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), नाना भानगिरे (Nana Bhangire), अजय भोसले (Ajay Bhosle), किरण साळी (Kiran Sali), भरत गोगावले (Bharat Gogawle), शैलेश टिळक (Shailesh Tilak), कुणाल टिळक (Kunal Tilak) उपस्थित होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

यावेळी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आपला वाघ हेमंत रासने याला आपल्याला निवडून आणायचं आहे

या मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यांना मी कोटी कोटी नमस्कार करतो, वंदन करतो

अतिशय दुर्लभ, दुर्मिळ चित्र आहे, हे ह्या कसबा मतदार संघात पाहायला मिळालं आहे

खरं म्हणजे ही पोटनिवडणूक दुर्देवाने लागली आहे

मलाही वाटलं नव्हतं की या पोटनिवडणुकीला समोर जावं लागेलं पण नियती समोर आपलं चालत नाही

मुक्ताताई यांच्या घरी मी गेलो होतो, त्या आजारी असताना देखील त्यांनी या भागातील प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर मांडले

हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे

मतदानासाठी मुक्ताताई आजारी असतानासुद्धा आल्या होत्या

कसबाचं मैदान हेमंत रासने मारतील

गिरीश बापट (Girish Bapat) साहेब यांना आम्ही सांगितले तुम्ही प्रचाराला येऊ नका, तुमचे आशीर्वाद हेमंत रासने यांच्यामागे असू द्या पण कार्यकर्ता काही ऐकत नाही

त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांने त्यांना काही स्वस्थ बसू दिले नाही

ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती

मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) साहेब यांनी निवडणुक बिनविरोध करा म्हणून विनंती केली.

 

त्या वेळेस आपण आपली उमेदवारी माघारी घेतली, ठरलेला उमेदवार आपण मागे घेतला

या ठिकाणीदेखील बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आम्ही विनंती केली

माघार तर जाऊ द्या, खालच्या पातळीचा प्रचार चालू आहे

याला उत्तर 26 तारखेला मतदार देतील

जेव्हा शेतकरी पाणी मागतो तेव्हा ही लोकं काय दाखवतात? धरण (अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला)

अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार

अजित पवार काल म्हणाले, मुख्यमंत्री जाहीर सभा का घेत आहेत, रोड शो करायची काय गरज असते?

एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता आहे

किती लोक रस्त्यावर उभी होती काहीजण सही घेत होते, काही एमपीएससीचे (MPSC) विद्यार्थी मला भेटले, हा भेटणारा माणूस आहे

हा तोंड लपवून पाळणारा माणूस नाही

या ठिकाणी MPSC चे विद्यार्थीदेखील आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणालाही यश घ्यायचं नाही

एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो

काही लोकांनी माझ्यावर टीका केली, काल माझ्या तोंडून लोकसेवा आयोगाच्या जागी निवडणूक आयोग (Election Commission) झालं

निवडणूक आयोग काय लोकसेवा आयोग काय रिझल्ट महत्त्वाचा आहे

रिझल्ट देण्याचं काम मी आणि देवेंद्रजी यांनी करून दाखवलं, ते आपण पाहिलं

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Chief Minister Eknath Shinde’s grand road show to campaign for BJP candidate Hemant Rasane; Enthusiastic response from the general public

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती