Pune Kasba Peth Bypoll Election | हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची 24 तारखेला कसब्यात रॅली, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची माहिती (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निवडणूकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत (Pune Kasba Peth Bypoll Election) आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 24 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची दुपारी तीनच्या सुमारास कसब्यात रॅली होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Shiv Sena Spokesperson Naresh Mhaske) यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी हेमंत रासने यांचा प्रचंड मतांनी विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

 

नरेश म्हस्के म्हणाले, कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजप आणि शिवसेना निवडणुकीला सामोर जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विवध समाजातील नागरिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या अनेक व्यथा मांडल्या. त्या सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आजपर्यंत विविध समाजाची बैठक कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ती बैठक घेण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याने नागरिक समाधानी आहेत. असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला.

 

 

पुण्यात राजकीय भूकंप होणार

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) हे सतत करत असलेल्या विधानामुळे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आमच्याकडे काम करत आहेत. आता त्यांच्याकडे राहिलेले उर्वरित आमदार आणि खासदार हे देखील लवकरच येतील. तसेच कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील ठाकरे गट (Thackeray Group), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

 

आरोपांचे पुरावे द्यावेत

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्या आरोपात काहीच तथ्य नसून एक दिवस ठाकरे गटातील शिल्लक नेते त्यांना मारतील.
त्यामुळे राऊतांनी त्या प्रकारचे विधान केले आहे.
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते.
राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असेही नरेश म्हस्के म्हणाले.

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | cm eknath shinde rally will be held on
24 february in kasba shivsena spokesperson naresh mhaske informed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा