Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : जाती – धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून उमेदवारी; धंगेकर विरुद्ध भाजप-युतीचे उमेदवार रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच लढणार असून काँग्रेसच्या (Congress) वतीने या मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर विरुद्ध भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

धंगेकर हे रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातून सातत्याने 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच दोन वेळा शिवसेना, दोन वेळा मनसे आणि एकवेळ काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून कसबा विधानसभा लढताना त्यांनी भाजपचे तगडे नेते गिरीष बापट यांना नाकीनऊ आणले होते. अवघ्या 7 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत ही त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.

 

2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना काँग्रेस मध्ये आणण्यास अन्य नेत्यांसोबतच काँग्रेसचे पदाधिकारी रोहित टिळक यांची महत्वाची भूमिका राहिली होती. टिळक यांनी त्यांना सर्वतोपरी मदत पुरवली होती. विशेष असे की यापूर्वी 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत टिळक आणि धंगेकर हे समोरासमोर उभे होते. त्यांच्यातील मत विभाजनामुळे तत्कालीन आमदार गिरीश बापट यांचा विजय अधिकच सुकर झाला होता. अशातच भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने टिळकांना मानणारा वर्ग धंगेकर यांच्या पाठीशी उभा राहण्याची दाट शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता महापालिकेत सत्ता आणण्यासाठी काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कसबा मतदार संघातून अधिकाधिक जागा निवडून
आणण्यासाठी कसबा मतदार संघातील विजय महत्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे देखील पूर्वीपासून धंगेकर यांच्यावर लक्ष आहे.
तसेच पूर्वाश्रमीचे शिवसेना आणि मनसेतील गोतावळा आणि मतदार वर्ग देखील धंगेकर
यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची चिन्हे आहेत. कुठलाही जात आणि धर्मभेद न करता काम करणारा
‘आपला माणूस’ म्हणून नावलौकिक असलेल्या धंगेकर यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही
निवडणूक सिरियसली घेतल्याचे दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Congress Ravindra Dhangekar Vs
BJP Hemant Rasane In Pune Kasba Peth Bypoll Election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा