Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ‘मोर्चेबांधणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली युवा उद्योजक पुनीत बालन यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराला आणि गाठीभेटीला वेग आल्याचे पाहायला मिळत आह. कसबा मतदारसंघ (Pune Kasba Peth Bypoll Election) हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असून बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपने गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्राचाराच्या रिंगणात उतरले तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांची भेट घेतली.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan News) यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांच्या निवासस्थानी काही महत्त्वाच्या निवडक व्यक्तींसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये उद्योजक पुनीत बालन यांच्याशी देखील 30 ते 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

कसबा मतदारसंघातील दीडशेपेक्षा अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत
केली जाते. या मदतीमुळे कोरोनाच्या साथीनंतर (Corona Pandemic) गणेशोत्सव (Ganeshotsav)
मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करुन शकले होते.
या मदतीमुळे गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते पुनीत बालन यांच्याशी जोडले गेले आहेत.
त्यामुळे या पोटनिवडणुकीत बालन यांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते.
यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बालन यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | DCM Devendra Fadnavis Meets Punit Balan In Pune Ahead of Kasba Peth By-Elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taraka Ratna Passes Away | तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन

Bhandara Crime News | धक्कादायक! कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने महाप्रसादाच्या मंडपात शिरली कार

Nagpur Crime News | BSF जवानाच्या पत्नीला अमानुष मारहाण; गर्भपात करण्यास नकार दिल्याने उचलले ‘हे’ पाऊल