Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, खासदार धनंजय महाडिक, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, धीरज घाटे, राजेश पांडे, गणेश बिडकर, दीलीप कांबळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, प्रमोद कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

जाहीरनामा महत्त्वाचे मुद्दे

नदीसुधारणा प्रकल्पाद्वारे कसब्याचा चेहरामोहरा बदलणार

पुढील तीन महिन्यांत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होणार

मंडईतील भाजी खरेदीचा आणि मध्यवर्ती भागात येऊन खरेदीचा आनंद द्विगुणीत होणार

“पार्किंगची कटकट संपणार, प्रदूषणाला चाप बसणार

हवामान बदलामुळे नव्याने उद्भवत असलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी निश्‍चित आराखडा तयार करून कार्यवाही करणार

क्लिन एअर सिटी प्रकल्पात पुण्याचा समावेश आहे, त्या अनुषंगाने कसब्यातील दाटीवाटीच्या भागातील हवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपाययोजना करणार

 

कसब्याचे पंचप्राण

शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार

सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

राजेंद्रनगर आणि सानेगुरूजी वसाहत या महापालिका वसाहतीचा पुनर्विकासाचा निर्णय झालेला आहे, तो मार्गी लावणार

शहरातील अस्तित्वात असलेल्या पार्किंग स्पेसेस विशेष मान्यता घेऊन मल्टिस्टोरिड व आधुनिक करणार

शहरातील सुपर हिट ठरलेल्या पुण्यदशम या बससेवेचा विस्तार करणार

कसब्यातील डे्रनेज, वॉटर लाईन, इलेक्ट्रिक लाईन, ऑप्टिकल फायबर, टेलिफोन केबल, रेनवॉटर लाइन यांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यथायोग्य नियोजन करणार

मतदारसंघातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिक्षालय आणि स्वच्छतागृह उभारणार

झोपडीधारकांंच्या घरांसाठी जीपीआरएस सिस्टिम कोड तयार करणार

महानगरपालिका रूग्णालय अत्याधुनिक सुविधांसह सक्षम करणार

घनकचर्‍याचे चोख व्यवस्थापन करणार

सर्व स्थानिक घटकांना विश्‍वासात घेऊन महात्मा फुले मंडईचे नव्या गरजांनुसार विकसन करणार

झोडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्यासाठी प्राधान्य देणार

महापालिकेच्या वतीने दरवर्षी एकदा लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जातो, तो महिन्यांतून एकदा करणार

पुण्यात गणेशोत्सवात स्पीकरसाठी असलेले बंधन दहाही दिवस उठवणार

पुण्याहून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वेचे नामकरण जय गणेश एक्सप्रेस करण्यासाठी पाठपुरावा करणार

गणेशोत्सवाचा इतिहास साकारणारे आंतरराष्ट्रीय संग‘हालय साकारणार

जुन्या पुण्यासाठी टीपी स्किम राबविणार

स्थानिक मालक, भाडेकरू यांचे विकसित जागेत पुनर्वसन करणार

क्रीडांगणे, व्यायामशाळा, समाजमंदिर, छोटी भाजीपाला केंद्र उभी करणार

मेट्रो स्टेशनमुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेता मंडई व परिसराचा प्रभावी वापर होण्यासाठी पुनर्विकास गरजेचा, वाढीव गाळे, पार्किंगवर भर

सारसबाग, पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम, गणेश कला क्रीडामंच, गरवारे भवन यांच्या पुनर्विकासाचे नियोजन

स्वारगेट नजिकच्या मल्टिमोडल हबशी जोडून महसूल वृद्धीच्या दृष्टिने या जागांचा पुनर्विकास
महिलांसाठी तुळशीबागेत सुरक्षिततेच्या उपाययोजना
तुळशीबागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करणार

पारंपरिक कला अंगी असलेला कुशल समाजासाठी प्रशिक्षण देणार, बाजारपेठ उपलब्ध करून देणार

भिडे वाड्याचा पुनर्विकास तातडीने करून फुले दाम्पत्याचे स्मारक करणार

प्राचीन वारसा असलेल्या वास्तू लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यटन आराखडा निश्‍चित करणार

हेरिटेज वॉकसाठी विशेष सुविधा निर्माण करणार

कसब्यातील तालमींचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करणार

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता हा परिसर नो व्हेईकल झोन करण्यासाठी आग्रह धरणार

आमदार निधीचा काही हिस्सा वस्तीतील काही सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या सुविधा उंचावण्यासाठी वापरणार

लाईट हाऊस प्रकल्पांची संख्या वाढवून अधिकाधिक तरुणांना रोजगारसक्षम बनविणार

देवदासी तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष आरोग्य केंद्र सुरू करणार
भाजीवाले, फेरीवाले, पथारीवाले या सार‘या व्यावसायिकांना व्यावसायिक सुरक्षा पुरविणार, पुनर्वसन करणार
रुग्यांसाठी अत्यल्प दरात चिकित्सा केंद्र

अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करणार
महिलांसाठी बायोटॉयलेट उभारणार

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Deputy Chief Minister Devendra Fadnavis Releases Resolution and Work Report of BJP Grand Alliance Candidate Hemant Rasane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | रोड शोनंतर हेमंत रासनेंचा PMPML मधून प्रवास, मतदारांशी साधला संवाद

Nashik Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर