Pune Kasba Peth Bypoll Election | हेमंत रासने 100 टक्के विजयी होणार ! मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. तसेच बावनकुळे यांनी हेमंत रासने (Hemant Rasane) विजयी होतील असा दावा केला. मात्र बावनकुळे यांनी हल्लाबोल करताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवारांवर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कसबा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुती 100 टक्के जिंकेल या स्थितीत आम्ही आलो आहोत. तसेच कसब्यातील मतदारांवर आमचा विश्वास आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या डबल इंजीन असलेल्या सरकारकडून कसब्यात जेवढ्या पेठा आहेत त्या पेठांचा पुनर्विकास करण्याची योजना या सरकारने केली आहे. हेमंत रासने निवडून आले तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आणि गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कसब्याचा जो विकास थांबला आहे तो करतील अशी अपेक्षा जनतेला आहे असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, हेमंत रासने हे शंभर टक्के निवडून येतील. मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि गिरीश बापट (Girish Bapat) यांनी कामं केल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी भाषणात हिंदुत्तवाचा नारा दिला.
तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर का जात आहात असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला.
त्यावर बोलताना ते म्हणाले, या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम्ही याविषयावर चर्चा केली नाही.
शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही,
हे चुकीचे आहे. शरद पवारांनी भाषण थांबवलं पाहिजे होतं. शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मत पाहिजेत का?
मुस्लीमांचे नाव घेऊन या निवडणूकीत हिंदुत्वाच्या विरोधी रंग आणण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या सभेतून झाला.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हिदुत्त्वाचा नारा दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे आणि राहिलेल्या लोकांना थांबवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यावतीची वक्तव्य करत असल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Hemant Raas will win 100 percent! Chandrasekhar Bawankule slams Sharad Pawar for commenting on Muslim opinion (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त