Pune Kasba Peth Bypoll Election | नागरिकांच्या मनातील परिवर्तनाच्या भावनेमुळेच माझा विजय निश्चित मानतो – रवींद्र धंगेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या (BJP) कामकाजाविषयी मतदारसंघात असलेली तीव्र नाराजी व मतदारांशी संपर्क साधल्यानंतर मला मिळालेला प्रचंड अनुकूल प्रतिसाद व त्यांच्यातील परिवर्तनाची भावना पाहता माझा विजय शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी काढलेल्या शेवटच्या रॅलीनंतर कॉंग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, नीता परदेशी, राजू शिरसाठ, गौतम अरगडे, आदींसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

विजयी झाल्यानंतर आपण सर्वप्रथम दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करणार असून सध्या प्रकृती ठीक नसणाऱ्या खासदार गिरीश बापट यांनाही चांगले आरोग्य लाभो अशा सदिच्छा मी व्यक्त करतो असे ते म्हणाले. ‘कसबा विकास परिषदे’चे आयोजन करून कसब्याच्या विकासाची पाच वर्षांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करणार असून त्यातील तातडीची दीड वर्षात करायची कामे यांवर मी भर देणार आहे. असे ते म्हणाले.

कसब्यातील वाड्यांच्या प्रश्नांचे दीर्घकालीन नियोजन करण्यास राज्यशासनाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न सोडवणार आहोत असे सांगून ते म्हणाले,
भाजपाला 30 वर्षे संधी असूनही त्यांचे कसब्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. मागील काही दिवसांपासून भाजपाचे मोठे नेते प्रचारात उतरले आहेत.
कसब्याचा विकास केला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती असे धंगेकर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

 

या निवडणुकीत आलेल्या अनुभवाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग, पैसे व गुंडांचा वापर,
जाती-जातींमध्ये फुट पाडण्याचा केलेला उद्योग व आजारी असलेले खासदार गिरीश बापट
यांना प्रचारात उतरविण्याचा केलेला प्रताप राजकारणी व लोकशाही मार्गाने निवडून येण्याची पातळी घसरविणारा ठरला.

 

हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठीपेक्षाही मतदानानंतरचा बोटावरील काळा ठिपका जास्त मौल्यवान आहे.
या आमच्या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे सर्वोच्च नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे चांगले सहकार्य आपल्याला लाभले.
ही निवडणूक नागरिक व कार्यकर्त्यांनीच हातात घेतली असल्याचे चित्र जाणवले असल्याचे व त्यामुळेच माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी कसब्याच्या विकासाचा कायापालट करणाऱ्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | I believe my victory is certain because of the sense of change in the minds of the citizens – Ravindra Dhangekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती