Pune Kasba Peth Bypoll Election | ‘शेवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो…’ मुख्यमंत्र्यांचे टिकाकारांना प्रत्युत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. नष्ठा काय असते ते मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि गिरिश बापट (Girish Bapat) यांनी दाखवून दिले आहे. गिरीश बापट यांना आम्ही आजारी असल्यामुळे प्रचारात येऊ नका असं सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी प्रचारात येऊन हेमंत रासने (Hemant Rasane) यांना बळ दिले. मुंबईत आम्ही उमेदवाराचा भरलेला फॉर्म माघारी घेतला. पण इथ तस घडलं नाही. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे. आमची इच्छा होती ही कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी पण मविआने ते होऊ दिलं नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. ते कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. त्यावेळी ते बोलत होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

शिवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो…

एमपीएससीच्या (MPSC) प्रश्नाबाबत उत्तर देत असताना मी निवडणूक आयोग म्हणालो यावरुन माझी खिल्ली उडवली. लोकसभा आयोग म्हणायचं होतं पण मी निवडणूक आयोग म्हणालो त्यावर टीका झाली. पण एक लक्षात घ्या निवडणूक आयोग (Election Commission) असो की लोकसभा आयोग शेवटी रिझल्ट महत्वाचा असतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं. (Pune Kasba Peth Bypoll Election)

त्यांनी शेतकऱ्यांना धरण दाखवलं

शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर आणि त्यांना ते धरण दाखवत नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण इथे खालच्या पातळीवरचा प्रचार सुरु झाला आहे. त्याला उत्तर मतदार देतील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अजित पवारांवर टिका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही कधीही चुकीचं बोलत नाही, असं चुकीच्या ठिकाणी जात नाही की, कृष्णा खोऱ्यात जाऊन प्रायश्चित्त करण्याची वेळी आमच्यावर आली नाही, यशवंतराव चव्हाणाच्या समाधीवर कोण गेलं होतं.

एकनाथ शिंदे जे बोलतो ते…

अजित पवार म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेयची असते. रोड शो करायचा नसतो. यावर बोलताना ते म्हणाले एकनाथ शिंदे माणसामधला कार्यकर्ता आहे. किती लोक रस्त्याने उभे होते, अनेकजण विषय घेऊन येत होते. विद्यार्थी भेटत होते. आम्हाला भेटायला लोक येत होते. एमपीएससी ची मुलं इथे आहेत. आम्हाला क्रिडिट घ्यायचं नाही पण विद्यार्थ्यांची भूमिका तीच आमची भूमिका हे आम्ही लोकसेवा आयोगाला सांगितलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करुन घेतो. माझ्या तोंडून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग झालं. आयोग कुठलाही असो रिझल्टला महत्त्व आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोलताना म्हणाले की, आमचे जुन्या नेत्यांनी ऑनलाईन
सभा घेतली आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील पण ते ऑनलाईन आले,
त्यांना कोणीतरी सांगितले असेल कसब्यात येवून काही उपयोग नाही, कारण इथे आपला आमदार निवडून येत नाही,
अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | kasba by election eknath shinde does what he says hemant rasane road show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?