Pune Kasba Peth Bypoll Election | पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाला उमेदवारी का दिली नाही?, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) निकालानंतर धक्का बसला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पराभव केला. ही निवडणूक उमेदवारीच्या निवडीपासून ते निकालापर्यंत राज्याच्या राजकारणात चर्चेचा आणि केंद्रबिंदू ठरली.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणूक जाहीर केली. या निवडणुकीत टिळक कुटुंबातील (Tilak Family) व्यक्तीला भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, टिळक कुटुंबाला डावलून भाजपने ब्राह्मणेतर उमेदवार हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पेठांमधील ब्राह्मण समाज (Brahmin Society) कमालीचा नाराज झाला. त्यांनी भाजपच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याने त्याचा फटका भाजपला बसला. भाजपला पेठांमधून कमी मतदान झाल्याचे टक्केवारीवरुन दिसून आले आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) परभाव झाल्यानंतर भाजपमध्ये आत्मचिंतन सुरु झाले आहे. कसब्यात टिळक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर निकाल वेगळा दिसला असाता अशी चर्चा निकालानंतर कसब्यात होती. दरम्यान, या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपले राजकीय वजन वापरले होते. त्यामुळे कसब्यातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडण्यात आलं. भाजपची उमेदवारी चुकल्याने कसब्यात पराभव झाला अशी चर्चा सुरु झाली. या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी टिळक कुटुंबाऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी का दिली याचे उत्तर दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा आणि मतदारांचा संपर्क कमी
झाला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचे दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं.
त्यांचे पती आणि मुलगा यांना मुक्ताताईंना वेळ द्यावा लागत होता.
त्यामुळे त्यांचाही राजकीय आणि सामाजिक संपर्क कमी झाला होता.

मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या असल्याने त्यांनी पुण्याच्या महापौर (Pune Mayor) झाल्या.
त्यानंतर आमदार झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी,
मात्र घरातील परिस्थितीमुळे त्यांचा प्रभाव कमी झाला होता.
त्यामुळे निवडणुकीत टिळक कुटुंबाऐवजी बाहेरचा उमेदवार दिला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या खुलाशावर राजकीय वर्तुळातून कशा प्रकारे प्रतिक्रिया येतात हे पहावे लागेल.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | kasba bypoll election chandrakant patil explain why bjp give preference to hemant rasne instead of tilak family in kasba peth pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील