Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचा पराभव करणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या (BJP) उमेदवाराचा पराभव केला. या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: लक्ष घतल्याने ही पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रतिष्ठेची झाली होती. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) देखील जोरदार प्रचार केला होता. रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहत भाजपचा पराभव केला.

कोण आहेत रवींद्र धंगेकर

रविंद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक (Shivsena) असून 1997 ते 2002 मध्ये त्यांची बहीण वंदना धंगेकर आणि त्यानंतर 2002 ते 2022 पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेत सलग चार वेळा निवडून आले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवसेना सोडल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी धंगेकर यांची ओळख होती. 2007 आणि 2012 या दोन्ही पुणे महापालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Election) धंगेकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. धंगेकर यांनी पुणे महापालिकेत शिवसेना आणि मनसेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी 2017 ला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत म्हणून पालिकेची निवडणूक लढवली आणि त्याही निवडणुकीत ते प्रचंड मतांनी निवडून आले.

धंगेकर त्यांनी कसब्यात अनेक विकास कामे केली होती.
त्यामुळे मनसेने 2009 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.
या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) यांचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर होते.
त्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता.
त्यानंतर 2014 निवडणूक लढवली मात्र त्याही निवडणूकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
मात्र आता पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) त्यांना यश आले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | know-in-detail-who-is-ravindra-dhangekar-who-showed-defeat-to-bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; राखी सावंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव गुलदस्त्यात

Kolhapur Crime | पीडित पत्नीची सुटका करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला कोल्हापूर पोलिसांकडून अटक

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)