Pune Kasba Peth Bypoll Election | ‘किंगमेकर’ निवडणुकीच्या मैदानात, फडणवीसांच्या भेटीनंतर बापटांनी बदलला निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन (Pune Chinchwad Bypoll Election) राजकीय वातावरण तापलं आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे अद्याप या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप (BJP) नेते आणि किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट (Girish Bapat) हे सक्रीय झाले नाहीत. बापट यांनी आजारी असल्याचे सांगत प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर बापट यांनी निवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

 

खासदार गिरीश बापट आणि संजय काकडे (Sanjay Kakade) या दोघांच्या काल भाजप नेत्यांनी भेट घेतल्यावर या दोघांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.

 

कसबा मतदारसंघाची निवडणुक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी बुधवारपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. प्रचाराची रणनिती आणि नियोजन करण्याची बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. फडणवीस यांनी बापट यांची घोले रोड परिसरात भेट घेतली. त्यानंतर आजारी असूनही बापट यांनी प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ते नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

आधी माघार… फडणवीसांच्या भेटीनंतर थेट मैदानात
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील अनेक वर्षांपासून गिरीश बापट यांची एकहाती सत्ता आहे.
त्यामुळे पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांना किंगमेकर असे म्हटले जाते.
मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्यावेळी देखील बापटांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
मात्र, पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या आजारपणाचे कारण पुढे करत घरोघरी जाऊन प्रचार करु शकत
नसल्याचे सांगत, निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतली आहे.
बापट यांनी बुधवारी आपला निर्णय जाहिर केल्यानंतर रात्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली.
यानंतर बापट यांनी आपला निर्णय बदलून प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title : – Pune Kasba Peth Bypoll Election | mp girish bapat attend election campaign in kasba constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना