Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान संथगतीने, तीन पर्यंत चिंचवडमध्ये 30.55 टक्के तर कसब्यात 30.05 टक्के मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) व महायुतीचे हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap), राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मात्र दोन्ही ठिकाणी मतदान (Voting) संथगीने सुरु असल्याचे दिसत आहे. तीन पर्यंत चिंचवडमध्ये 30.55 टक्के तर कसब्यात 30.05 टक्के मतदान झाले आहे. मतदान संपण्यासाठी शेवटचे तीन तास शिल्लक राहिले आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख 75 हजार 679 मतदार असून, 270 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. रविवारी होणाऱ्या मतदानासाठी 1250 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर चिंचवड मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख 68 हजार 954 मतदार असून, 510 केंद्रांवर मतदान होणार आहे.

कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 यावेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 यावेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 यावेळेत 20.68
तर 1 ते 3 यावेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 यावेळेत 6.5 टक्के,
9 ते 11 यावेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 यावेळेत 18.50 तर 1 ते 3 यावेळेत 30.05 टक्के मतदान झाले आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Polling in Kasba and Chinchwad voting slowed down, up to 30.55 percent in Chinchwad and 30.05 percent in Kasba.