Pune Kasba Peth Bypoll Election | पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रवींद्र धंगेकरांचे उपोषण मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर भाजपने (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला होता. याचा निषेध करण्यासाठी ते उपोषणाला बसले होते. अखेर पोलिसांनी (Pune Police) कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी उपोषण (Hunger Strike) मागे घेतले आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. मात्र, कसबा मतदारसंघात पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे पराभूत मानसिकतेतून ते भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा बेछूट आरोप करत आहेत. हा कसब्यातील मतदारांचा अपमान असून ते कधीच सहन करणार नाहीत. तसेच निवडणुकीतील पराभवाची कारणे धंगेकर यांनी आतापासून शोधण्यास सुरुवात केली असल्याचा पलटवार आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी केला आहे.

धंगेकरांचा काय आहे आरोप?

रविंद्र धंगेकर म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखलनंतर आम्ही निवडणूक आयोगाने (Election Commission)
दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. परंतु भाजपच्या कर्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पैशांचे वाटप केले आहे.
स्वत: गिरीश महाजन (Girish Mahajan) हे गुन्हेगारांना सोबत घेऊन मतदारसंघात फिरत होते.
असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षीत होते. माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे.
यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन देखील कारवाई झाली नाही.
भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असून संविधान टिकवण्यासाठी आपण उपोषण करत असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले होते.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | pune bypoll election congress candidate ravindra dhangekar hunger strike over the assurance of police action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांत गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | ब्राह्मण समाज काही मागत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)