Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठेत रासने Vs धंगेकर नव्हे तर भाजप – काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात लढत होत आहे. कसबा पेठ पोटनिवडणूकीची मतदानाची तारीख जस जशी जवळ येत चालली आहे तसतशी चूरस वाढत चालली आहे. या निवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) सोमवारपासूनच प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंचे दिग्गज नेते येणार आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही निवडणूक रासने विरुद्ध धंगेकर यांच्यात नसून भाजप विरुद्ध काँग्रेस (Congress) मध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले की, कसब्यात होणारी निवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) ही रासने विरुद्ध धंगेकर नसून भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये आहे. ही निवडणूक महानगरपालिकेची नाही. धंगेकर विरुद्ध रासने अशी ही निवडणूक नाही. ही विधानसभेची पोटनिवडणूक आहे. त्या विधानसभेमध्ये राज्याचे कायदे तयार केले जातात, राज्याच्या वेगवेगळ्या पॉलिसी ठरतात आणि त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये आहे. महाविकास आघाडीचे कसब्यात अस्तित्व नसून त्यांनी काँग्रेसला वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पहिले 33 महिने सरकार होतं त्यावेळीही असचं चित्र होते. काँग्रेसचा काही रोलच नसायचा आणि बाकीचे दोन जण सत्ता चालवायचे. आताही काँग्रेसचं तिकीट आहे ना त्यांचं त्यांना करु द्या असंच आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस देशात टिकली नाही, राज्यात टिकली नाही तर गल्लीत कशी टिकेल असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मतदारसंघात….
या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पक्षांकडून मतदारसंघातील ब्राह्मण (Brahmin) आणि मराठा (Brahmin) या अधिक लोकसंख्येच्या समाजाच्या प्रतिनिधींना उमेदवारी दिली आहे. बारा बलुतेदारांची वस्ती असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात ओबीसी मतदारांची (OBC Voters) संख्या ही जास्त आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये अटीतटीची लढत होणार असून दोन्ही बाजूंच्या पक्षसंघटना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत.

 

प्रचारात दिग्गज नेत्यांची एन्ट्री
महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने ही पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपने हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांच्यासह दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना देखील प्रचारात उतरवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह तिन्ही पक्षाचे नेते प्रचारात सहभागी होत आहेत.

 

मतदारसंघात महिला राज
जिल्हा निवडणूक शाखेकडून कसबा मतदारसंघाची अंतिम मतदारयादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. हीच यादी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यानुसार कसबा पेठ मतदारसंघात 2 लाख 75 हजार 428 मतदार आहेत. 2019 च्या तुलने 15 हजार 296 मतदारांची संख्या वाढली आहे. कसबा पेठ मतदारसंघामध्ये 1 लाख 36 हजार 873 पुरुष, 1 लाख 38 हजार 550 महिला तर 5 तृतीयपंथी मतदार आहेत.

कसा आहे मतदार संघ
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Constituency) येतो. जुन्या पुणे शहरातला महत्त्वाचा भाग या मतदारसंघात येतो. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth), शनिवार पेठ (Shaniwar Peth), नारायण पेठ (Narayan Peth), सदाशिव पेठ (Sadashiv Peth), बुधवार पेठ (Budhwar Peth), रास्ता पेठ (Rasta Peth), भवानी पेठ (Bhawani Peth) या भागांचा समावेश होतो. पुण्यातील जुन्या बाजारपेठेचा भाग जसं की लक्ष्मी रोड (Lakshmi Road), तुळशीबाग (Tulshibagh) याच मतदारसंघात आहे. काही भागात मुस्लिम, दलित समाजाची वस्ती आहे, तर बाजारपेठेमुळे व्यापारी वर्गही याठिकाणी स्थायिक झाला आहे.

 

1995 सालापासून भाजप नेते गिरिश बापट कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते. 2019 मध्ये भाजपने गिरीश बापट (MP Girish Bapat) यांना खासदारकीचे तिकीट दिले. लोकसभेच्या या निवडणुकीत गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मुक्ता टिळक यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.

 

भाजपने सर्व पक्षसंघटना प्रचारात उतरवल्या
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली नसल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या नेत्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांचा वेळ जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतल्यानंतर बापट यांनी प्रचारात सहभागी होत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कले. कसबा पेठ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व पक्षसंघटना प्रचारात उतरवल्या आहेत.

बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला
कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आपली ताकद लावली आहे.
तर भाजपने आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होतील.
तसेच बालेकिल्ला हातातून नसटल्याने भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसले.
यामुळे हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने आपली सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली आहे.

 

Kasba Peth मतदार संघातील मतदारांची संख्या – 2,75,428

 

कसबा मतदारसंघाचे मनपामधील पक्षीय बलाबल – एकुण नगरसेवकांची संख्या – 18

 

भाजप – 13
राष्ट्रवादी काँग्रेस – 2
काँग्रेस – 2
शिवसेना – 1

 

निवडणूक निकाल सन 2019

मुक्ता टिळक (भाजप) – 75,492
अरविंद शिंदे (काँग्रेस) – 47, 296
विशाल धनवडे (अपक्ष) – 13,989
अजय शिंदे (मनसे) – 8,284

निवडणूक निकाल सन 2014

गिरीष बापट (भाजप) – 73, 594
रोहित टिळक (काँग्रेस) – 31,322
रविंद्र धंगेकर (मनसे) – 25,998
दीपक मानकर (राष्ट्रवादी) – 15,865
सुर्यकांत आंदेकर (अपक्ष) – 10,001
प्रशांत बधे (शिवसेना) – 9,203

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Pune Kasba Peth Bypoll Election Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar fight between BJP – Congress ‘Kante ki Takkar’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन