Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसब्यात सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो, मात्र चिंचवडमध्ये…; पोटनिवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election Result) महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे 11 हजार 040 मतांनी विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मनसे (MNS), शिंदे गट (Shinde Group) आणि सर्वच मंत्र्यांना मैदानात उतरवले होते. मात्र कसब्यातील मतदारांनी धंगेकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावर (Pune Chinchwad Bypoll Election Result) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवार म्हणाले, निकाल समोर येण्याआगोदर काही बोलणं चुकीचे आहे म्हणून बोललो नव्हतो. माझी आता स्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून या पोटनिवडणुकीला सामोरे गेलो होतो. कसब्यात गेले 25 वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. मात्र, आम्ही योग्य निर्णय घेऊन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी आम्ही आर्धी निवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election Result) जिंकलो होतो, असे अजित पवार म्हणाले.

 

हा एकजुटीचा विजय
धंगेकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका ताकतीच्या नेत्याला पराभूत केले होते. कसब्यातील निवडणुकीचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असून मी रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन करतो. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, ज्या प्रकारे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आले आहे, ते जनतेला आवडले नाही. शिंदे फडणवीस सरकार जनतेला मान्य नसल्याची टीका त्यांनी केली.

 

कसब्यात जनतेने आम्हाला कौल दिला
रवींद्र धंगेकर तळागाळात काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक नेते त्याठिकाणी होते. या सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र, कसब्यातील जनेतेने कौल आमच्या बाजूने दिला. विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची गरज होती त्या-त्या गोष्टींचा वापर करुन देखील महाविकास आघाडीने ती जागा खेचून आणली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

दोन्ही ठिकाणी भावनीक मुद्दा होता, पण…
चिंचवडच्या पराभवावर बोलताना अजित पवार म्हणाले, दोन्ही मतदारसंघात भावनिक मुद्दा होता,
पण तरीही सहानभुतीचा मुद्दा पुढे आला नाही.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना (Shivsena) पक्ष कसा काढून घेतला हे मतदारांना आवडले नाही.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये याची प्रचंड चिड आहे. सत्ताधाऱ्यांनी अनेक मंत्र्यांना दोन्ही मतदारसंघात फिरवले मात्र त्याचा काही फरक दिसला नाही.
राहुल कलाटे (Rahul Kaate) आणि नाना काटे (Nana Kaate) यांची मते एकत्र केली तर ती भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत.
यावरुन भाजपच्या विरोधातील मतदारांचा रोष लक्षात येतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कलाटेंनी फॉर्म मागे घेऊन नये यासाठी प्रयत्न केले
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मला राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांनी उमेदवारी मागितली होती.
या दोघांतील एकाला उमेदवारी देण्यात यश मिळाले असते तर आम्ही यशस्वी झालो असतो.
दोन्ही मतदारसंघ हे भाजपचे आहेत. राहुल कलाटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला नसता तर दोन्ही ठिकाणी आम्ही विजयी झालो असतो.
मी चिंचवडमध्ये राहुल कलाटेचा फॉर्म मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याने ऐकले नाही.
राहुल कलाटे याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मला याबाबत माहिती मिळत होती.
सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा वापर करुन ही निवडणूक लढवल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election Result | chinchwad bypoll election result leader of opposition ajit pawar reacted on chinchwad by election result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा