Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसब्याचं मैदान कोण मारणार?, निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांची मनाई; CP रितेश कुमार यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election Results | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.2) होत आहे. या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election Results) कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील भारतीय खाद्य निगम (FCI) गोदामात होणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणांमुळे पहिल्या पासून चर्चेत राहिली आहे. कसबा हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असल्याने कसब्याची जागा जिंकण्यासाठी भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवले होते. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) देखील जोरदार प्रचार केला. याच दरम्यान पैसे वाटपाचे आरोप केले गेले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी निकाल जाहीर होणार असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे एक ते दीड वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांनी बुधवारी (1 मार्च) पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

निकालानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून
मतमोजणीच्या ठिकाणी तसेच शहराच्या मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ,
नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, काशेवाडी भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे. याशिवाय कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत (Pune Traffic Branch) बदल करण्यात आला आहे. तर विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील (Crime Branch) पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास…

खबरदारीचा उपाय म्हणून समाजमाध्यमांवर देखील पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्य़कर्त्यांची बैठक आयोजित केली असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title :-Pune Kasba Peth Bypoll Election Results | strict police security in kasba and police prohibited from taking out victory procession after the result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती