Pune Kasba Peth Bypoll Election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये गुप्त खलबते!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे (Ajay Shinde MNS) यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यादरम्यान गुप्त खलबते झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अजय शिंदे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून (Pune Kasba Peth Bypoll Election) यापूर्वी निवडणूक लढवली आहे, यामुळे या गुप्त बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेदेखील यापूर्वी मनसेकडून कसब्यामध्ये लढले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्व आणि विकास या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला आहे.
मात्र, तरीही मनसे कार्यकर्ते आतून धंगेकर यांचेच काम करीत असल्याच्या चर्चा आहेत.
या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यांच्या गुप्त बैठकीमुळे
धंगेकर यांना मनसेकडून मिळणारी छुपी रसद देखील बंद होईल, अशी चर्चा आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Secret quarrel between Chief Minister Eknath Shinde and Maharashtra Navnirman Sena’s former president of Pune Ajay Shinde!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विश्रांतवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

Harbhajan Singh | हरभजन सिंगने केली के एल राहुलची पाठराखण; म्हणाला ‘त्याने कोणताही गुन्हा केला नाही’

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?