Pune Kasba Peth Bypoll Election | शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती पण…, चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप (BJP) आणि महायुतीचे उमेदवार उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) हे चांगल्या मताने जिंकून येतील. आमचे सगळे कार्यकर्ते मॅन टु मॅन प्रचार करत आहेत. राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी (Pune Kasba Peth Bypoll Election) काम करतील यावर लोकांचा विश्वास आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. भाजपचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजिक केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होत की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस राष्ट्रवादी भुईसपाट होईल. त्यांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालतील पण फडणवीस नको आहेत. हाच अजेंडा आहे. त्यामुळेच पवार हे फडणवीस यांना विरोध करायचे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करु शकतात, असा खळबळजनक गौप्यस्फोट बावनकुळे यांनी केला आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

शरद पवार फडणवीस द्वेषी

शरद पवार हे फडणवीस द्वेषी आहेत. त्यांना फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला करुन कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी चालेल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस मुख्यमंत्री नकोत अशी भूमिका शरद पवारांची होती. फडणवीसांचा द्वेष हा शरद पवारांचा मूळ अजेंडा आहे. आताही ते फडणवीस मुख्यमंत्री नकोत अशा भूमिकेत आहेत. त्यांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रात पुन्हा 15 वर्षे भाजपचे सरकार (BJP Government) येईल आणि आपल्याला कधी सत्येत येता येणार नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री न करण्यासाठी ते काहीही करु शकतात आणि त्यांनी ते केलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार
(NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला.
त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली.
ती उठल्यानंतर काय घडलं ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे. राज्यात तेव्हा तसं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असं शरद पवार म्हणाले.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | sharad pawar is afraid of devendra fadnavis work said chandrasekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime News | बीड हादरलं ! अंध आईसोबत भीक मागणाऱ्या चिमुरडीवर नराधमाकडून अत्याचार

Pune Crime News | पोलीस वसाहतीमधून पोलिसाची दुचाकी चोरीला, पोलीस वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nawazuddin Siddiqui | अखेर नवाजुद्दीन सिद्दिकीने पत्नी आलियाने केलेल्या आरोपांवर सोडले मौन; म्हणाला – ‘माझ्या मुलांचे नुकसान …’