Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोट निवडणुक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार; संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती

0
1030
Pune Kasba Peth Bypoll Election | Shiv Sena grand alliance of BJP-Bala Saheb will fight in Kasba pot election with full strength; Appointment of Sandeep Khardekar as Coordinator
file photo

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांचा निर्धार

पुणे : Pune Kasba Peth Bypoll Election | आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आज संपन्न झाली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे , प्रदेश सचिव किरण साळी, संपर्कप्रमुख अजय भोसले, लीनाताई पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे, प्रसिद्धीप्रमुख संजय अगरवाल, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदीताई गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक, राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर भाजपा नेते शैलेश टिळक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफिल न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोट निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाची राष्ट्रीय निवड समिती करेल. त्यामुळे महायुतीच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहेत. सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

बिनविरोध निवडणुकीसंदर्भात विचारले असता नामदार पाटील म्हणाले की,
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे.
त्यासाठी पक्षाच्या नेत्या आ. माधुरी मिसाळ यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे.
दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे.
त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत.
तसेच राज्य स्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याकडे महायुतीतील
सर्वच घटक पक्ष आणि विविध ज्ञाती संस्थांशी संपर्कासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची
घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केली.

Web Title :-   Pune Kasba Peth Bypoll Election | Shiv Sena grand alliance of BJP-Bala Saheb will fight in Kasba pot election with full strength; Appointment of Sandeep Khardekar as Coordinator

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे