Pune Kasba Peth Bypoll Election | पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात 1700 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी (26 फेब्रुवारी) होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) बंदोबस्ताची आखणी केली आहे. मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) नऊ मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 

कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे, अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी केली आहे. शनिवारपासून कसबा मतदार संघातील वेगवेगळ्या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

मतदानाच्या दिवशी कसबा मतदारसंघात 1700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. शहर पोलिस दलातील एक हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) 500 जवान आणि राज्य राखीव पोलिस दलातील शंभर पोलिस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा (ACP S. Raja) या वेळी उपस्थित होते.
समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोटनिवडणूक होत आहे. 76 मतदान केंद्रांवरील 270 बूथवर मतदान होणार असून मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपहारगृहे, खाद्यपदार्थ गाड्या, टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

सराइतांवर प्रतिबंधात्मक कारवाई
कसबा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांनी ठिकाठिकाणी तपासणी नाके सुरू केले होते.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 32 लाख 18 हजार 500 रुपये जप्त केले होते. संबंधित रोकड निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
पोलिसांनी 33 हजार 785 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन हजार 789 सराइतांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 119 शस्त्रे जप्त करण्यात आली.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Strict deployment of 1700 policemen in Kasba constituency for by-elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | बुधवारी डेक्कन, कोथरुड भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Crime News | जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात