Pune Kasba Peth Bypoll Election | ‘येथे सोने, चांदी, पैसे स्विकारले जाईल, मत मात्र…’, कसब्यातील ‘त्या’ पोस्टरची शहरात चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीमुळं पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असून हा मतदारसंघ (Pune Kasba Peth Bypoll Election) आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपचे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कसब्यात ठिकठिकाणी लावलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या या फलकांची चर्चा पुणे शहरात जोरदार सुरु आहे.

 

 

कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भाजप, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शिवसेनेच्या (Shivsena) वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभागी होत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) हे प्रचारात उतल्याने रंगत वाढली आहे. कसब्यात रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत होत असली तरी खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होत असल्याने सर्वांचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे.

पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असून येत्या रविवारी (दि.26) मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कसब्यात लावण्यात आलेल्या लहान फलकांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मंगळवारी मध्यरात्री कसब्यातील वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागेवर लहान लहान फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘इथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप-मत मात्र रवी धंगेकरलाच दिले जाईल. यंदा कसब्यात धंगेकरच’ तसेच ‘कोणी कितीही म्हटलं, ‘तुमचं काम मार्गी लावतो’ पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही आमिषं दाखवू नयेत.
यंदा कसब्यात धंगेकरच’ असे फलक लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | that bjp banner kasba constituency in political excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा बालसुधार गृहातून फरार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

Pune Kasba Peth Bypoll Election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
पुण्याचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये गुप्त खलबते!

Hruta Durgule | पोस्ट शेअर करत ऋता दुर्गुळेने केली मोठी घोषणा; म्हणाली “आजचा दिवस…”