Pune Kasba Peth Bypoll Election | ‘दुःख वाटते की पक्षाने माझी दखल घेतली नाही..;’ कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब दाभेकरांनी व्यक्त केली खंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले. यावेळी त्यांची काँग्रेस पक्षाकडून दखल न घेतली गेल्याची खंत बोलून दाखवत बाळासाहेब दाभेकरांनी (Balasaheb Dabhekar) पक्षावर नाराजी व्यक्त केली.

यावेळी बोलताना बाळासाहेब दाभेकर म्हणाले, ‘मी काँग्रेस (Congress) पक्षाचा ४० वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत पक्षाकडे काहीही न मागता काम करत राहिलो. पण कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन कसबा विधानसभा पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) लढण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. मात्र मला उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असून मला दुःख वाटते की पक्षाने माझ्या कामाची दखल घेतली नाही.’ अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी मांडली. तर यावेळी काँग्रेस पक्षाकडून अन्याय झाल्याचे देखील ते म्हणाले. तर या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडुण येईल. असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.

तर, दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)
यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली असून
महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल (दि.०६) या दोन्ही
उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर आज काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढत
उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | the congress party did me injustice balasaheb dabhekars allegation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’