Pune Kasba Peth Bypoll Election | हा तर पॉलिटिकल स्टंट, रविंद्र धंगेकरांच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | पुण्यात कसबा पेठ पोटनिडणुकीचा प्रचार काल पाच वाजता थांबला. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजप (BJP) तसेच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार करुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर भाजपने पोलीस संरक्षणात पैशांचे वाटप केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. तसेच याचा निषेध करण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविंद्र धंगेकर उपोषण करुन पॉलिटिकल स्टंट (Political Stunt) करत असल्याची टीका केली.

रविंद्र धंगेकर यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. हे माहित असताना अशा प्रकारचा स्टंट करुन एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. ज्यावेळी पायाखालची वाळून सरकते त्यावेळी अशा प्रकारचे स्टंट केले जातात. हे आचारसंहितेचे (Code of Conduct) उल्लंघन असल्याचे फडणवीस म्हणाले.

पैसे वाटणे काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती

पैशांचे वाटप करणे हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची (NCP) संस्कृती आहे. भाजपची नाही. आमचा मतदार देखील असा नाही. जो पैसे घेऊन मतदान करेल. मतदारांचा अपमान करण्याचे काम धंगेकर यांनी केलं आहे. धंगेकर यांचे हे उपोषण भाजप विरुद्ध नसून ते मतदारांच्या विरुद्ध आहे. कारण ते मतदारांना बिकावू ठरवत आहेत. हे चुकीचे आहे. देव त्यांना सुबुद्धी देवो असंही फडणवीस म्हणाले.

केवळ सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न – जगदीश मुळीक

दरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish Mulik) यांनी धंगेकर
यांनी केलेले आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर हल्लाबोल केला. जगदीश मुळीक म्हणाले, वरंवार पक्ष बदलणारे
आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे कसब्यातील (Pune Kasba Peth Bypoll Election) मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहेत. हा कसब्यातील सर्व मतदारांचा अपमान आहे. कसब्यातील मतदार हे सहन करणार नाहीत. भाजपच्या उमेदवारावर खोटे आरोप करुन केवळ सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. समोर दिसत असलेल्या पराभवामुळे अशा प्रकारचे आरोप करत आहेत. ते आम्ही सहन करणार नसल्याचे मुळीक यांनी सांगितले.

जगदीश मुळीक पुढे म्हणाले, काल पाच वाजता प्रचार बंद झाल्यानंतर अशा प्रकारचे खोटे आरोप करुन,
स्टंटबाजी करुन ते एक प्रकारे प्रचार करत आहेत. उपोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
असे कोणतेही कृत्य केले तर भाजप निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करुन
त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करेल. तसेच धंगेकर यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो यासाठी
आमचे कार्यकर्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि पुणेश्वर मंदिर येथे आरती करणार असल्याचे
जगदीश मुळीक यांनी सांगितले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | this is a stunt devendra fadnavis alleges that ravindra dhangekar violated the code of conduct

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीसांना सनसनाटी निर्माण करायची सवय, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा टोला

Petrol-Diesel Price Hike | ‘या’ शहरात पेट्रोल झाले महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)