Pune Kasba Peth Bypoll Election | आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दिग्गज नेते कसब्यात तळ ठोकून आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार शुक्रवारी (दि.24) सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election ) शिवसेना-भाजप महायुतीकडून (Shiv Sena-BJP alliance) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रोड शो करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून दुपारी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. शेवटचे काही तास शिल्लक राहिल्याने दोन्ही बाजूने प्रचाराला वेग आला आहे.

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle), चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रचारात सहभाग घेतला.

तर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (former CM Ashok Chavan), प्रणिती शिंदे (Praniti Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सचिन आहिर यांनी प्रचारात सहभाग घेतला. तर गुरुवारी झालेल्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ध्वनिचित्रफित मार्फत मतदारांशी संवाद साधला.

संध्याकाळी सहा वाजता प्रचार थांबणार

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान (Voting) होणार आहे.
प्रचाराचा कालावधी (Pune Chinchwad Bypoll Election) 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता
संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने (Election Commission) लागू
केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे
(Code of Conduct) उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल,
असे निवडणुक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते (Sneha Kiswe-Devkate) यांनी सांगितले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Today is the last day of campaigning, veteran leaders in the field

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी