Pune Kasba Peth Bypoll Election | आम्ही मुंबईकरांच्या ५०० चौ.फुट घरांचा कर माफ केला तर भाजप युतीने पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत काढून घेतली – आदित्य ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | आम्ही मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation (BMC) सत्ता हाती घेतली तेंव्हा पालिकेकडे ६ हजार कोटी रुपये होते. २५ वर्षांच्या सत्तेत कुठलिही करवाढ न करता ९० हजार कोटींवर पोहोचले आहेत. आमच्या कामावर मुंबईकरांनी विश्‍वास ठेवला. त्याच महापालिकेची चौकशी केली जात आहे. मुंबई महापालिकेची बिनधास्त चौकशी करा पण त्याचवेळी पुणे, नागपूर, नाशिक, मीरा भाईंदर महापालिकेचीही चौकशी करा. आम्ही ५०० चौ. फुटांच्या घरात राहाणार्‍या मुंबईकरांचा कर माफ केला, पुणेकरांची मात्र मिळकत करातील ४० टक्के सवलत काढून घेतली. केवळ जाती- धर्मात तेढ वाढवून बेरोजगारी व अन्य प्रश्‍नांकडे लक्ष वेधून दिशाभूल करणार्‍या भाजप (BJP) युतीचा पराभव नागरीच करतील, असा विश्‍वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते आदीत्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज येथे केला. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कॉंग्रेस (Congress) महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथे झाल्यानंतर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) आणि मित्र पक्षाचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

आदीत्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) अडीच वर्षांच्या काळात कोरोना असतानाही राज्यात अनेक उद्योग आणले. या उद्योगांची उभारणी अंतिम टप्प्यात असून यातून मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. याउलट राज्यातील गद्दार सरकारने येथील उद्योग गुजरातला हलविण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी संकटात सापडला आहे. शिवसेनेशी गद्दारी करणारे खोके घेउन दिल्लीकरांच्या मांडीवर बसले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेशी केलेली गद्दारी जनतेला रुचलेली नाही. यामुळे घाबरलेले भाजप शिंदे सरकार (BJP Shinde Government) निवडणुका घेण्यास घाबरत आहे. जनतेचे प्रश्‍न बाजूला ठेउन केवळ जातीपाती आणि धर्मामध्ये कलह लावून सत्ता ओरबड्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसब्याची निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे.
आदीलशाही, मुघलशाही आणि इंग्रजांविरोधात या पुण्यातूनच सर्वात प्रथम बंड झाले आहे.
त्यामुळे ही निवडणूकही देशाला दिशा ठरणारी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या स्वराज्यासाठी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी, महात्मा फुलेंच्या सर्वधर्मसमभाव चळवळीसाठी जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे.
परंतू कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रविंद्र धंगेंकरांसारखा जनतेतील कार्यकर्ता विधानसभेत पाठवा असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | We waived the tax on 500 sq ft houses for Mumbaikars, while the BJP alliance took away 40% income tax exemption from Pune residents – Aditya Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Crime News | मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांकडुन अटक