Pune Kasba Peth Bypoll Election | ‘कसबा मतदारसंघातील जुने वाडे, धोकादायक इमारती, हेरीटेज वास्तूंचे पुनर्विकास करणार’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ मतदारसंघातील जुने वाडे, धोकादायक इमारती आणि हेरिटेज (Heritage) वास्तूंचा पुनर्विकास (Redevelopment) करण्यासाठी नियमात जे बदल करावे लागतील ते सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कसब्यतील दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि मुलगा कुणाल टिळक (Kunal Tilak) यांची भेट घेतली. या बैठकीत जवळपास वीस मिनिटे चर्चा झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थी आंदोलन (MPSC Student Agitation), पुण्यातील जुने वाडे, धोकादायक इमारती यावर भाष केलं. यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे उपस्थित होते.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ही निवडणूक भाजप-शिवसेना महायुतीचे (BJP-Shiv Sena Alliance) उमेदवार मोठ्या फरकाने जिंकणार आहेत.
कसबा पेठ मतदारसंघातील जुन्या वाड्यांचे पुनर्वसन, इतर धोकायदायक इमारती, हेरिटेज वास्तूंचा पुनर्विकास या विषयासंदर्भात मागील वेळी मी आलो होतो त्यावेळी मुक्ता टिळक यांनी आजारी असताना निवेदन दिले होते.
तेव्हापासून आम्ही त्याच्यावर काम सुरु केलं आहे.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून हे विषय आम्ही प्राधान्याने हाती घेतले असून यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील
ते निर्णय सरकार घेणार आहे. त्यामुळे जुने वाडे, इमारती, हेरेटेज वास्तूंचा पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा होईल.
त्यासाठी नियमामध्ये जे बदल करावे लागतील ते सरकार करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शरद पवार आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जाणार म्हणून आयोगाने अचानक निर्णय घेतला का?
असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, कोणी येणार, कोणी जाणार यामुळे निर्णय घेतले जात नसतात,
असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार (Sharad Pawar) आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
तसेच आयोग स्वायत्त असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Will redevelop old mansions, dangerous buildings, heritage structures in Kasba constituency – Chief Minister Eknath Shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Pune Kasba Peth Bypoll Election | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा