Pune Kasba Peth Bypoll Election | जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप (BJP) महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचार सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

 

भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत पाटील बोलत होते. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

उमेदवार हेमंत रासने, माजी खासदार संजय काकडे (Former MP Sanjay Kakde), माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble), शैलेश टिळक (Shailesh Tilak), कुणाल टिळक (Kunal Tilak), सुधाकर भालेराव, सम्राट थोरात, अर्चना पाटील, अजय खेडेकर, विष्णू कसबे, शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, मेट्रो (Pune Metro), जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी 200 आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील असे ही पाटील म्हणाले.

कोण आहे धंगेकर?
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मी गेले दाहा बारा दिवस ऐकतोय ही निवडणूक धंगेकर विरुद्ध रासने यांच्यात आहे. कोण आहे धंगेकर? एक नगरसेवक आहे. माझ्या अधिच्या वक्त्यांनी उल्लेख केला की त्यांनी नगरसेवक म्हणूनही कामं केली नाहीत. मतदारसंघात रस्ते झाले नाहीत, गटर दुरुस्त केली नाहीत. मी म्हणतो केली कामं पण ती महापालिकेच्या माध्यमातून. पण विधानसभेत निवडून जाण्यासाठी एक राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार लागतो. विधानसभा ही कायदे करण्यासाठी असते. विधानसभा ही राज्याची दिशा ठरवणारी असते. त्याला सत्तेत असणारा पक्ष लागतो. धंगेकर त्याठिकाणी जाऊन कायदा तयार करणार का? त्यांना काहीही करता येणार नाही.

 

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता देखील मिळाला नाही
रविंद्र धंगेकर यांच्या पक्षाला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता देखील मिळाला नाही. 572 लोकसभेमध्ये दहा टक्के म्हणजे 57 खासदार यावे लागतात मग विरोधी पक्षनेता मिळतो. यांचे आलेत 44 खासदार. त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळाले नाही. एवढ्या मोठ्या देशाला विरोधी पक्षनेता मिळाला नाही. तुम्हाला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता मिळवता आला नाही असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

चांगलं पद मिळालं होतं तेही तुम्ही
जे विश्वास घाताने आलेलं सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये तुम्हाला विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं.
तुम्ही कोणालाही न विचारता राजीनामा दिला. बारा कोटी महाराष्ट्राच्या विधानसभेला जवळपास सव्वादोन वर्ष विधानसभेचा अध्यक्षच नव्हते.
कारण तुमचे एकमतच होत नव्हतं. एक चांगलं पद मिळालं होतं तेही तुम्ही सोडलं.
त्यामुळे 33 महिन्याच्या सरकारमध्ये तुम्हाला काही किंमत नव्हती. केवळ राष्ट्रवादीने (NCP) सत्ता चालवली, सत्ता उपभोगली.
शिवसेनेला (Shivsena) देखील काही मिळालं नाही. केवळ उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पद मिळाले त्यात ते समाधानी होते.
सगळी सत्ता चालवली, उपभोगली ती राष्ट्रवादीने. त्यामुळे महाराष्ट्रात तुमचे काही नाही. तुम्हाला असली मंत्रीपद दिली की त्या मंत्रीपदाला काहीच अर्थ नव्हता, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

व्यक्ती म्हणून कोण चांगले आहे याला…
देशाचे पंतप्रधान भाजप, राष्ट्रपती भाजपचे, उपराष्ट्रपती भाजपचे, लोकसभेचे अध्यक्ष भाजपचे देशातील 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
अशा पक्षाचा माणूस आपण ज्यावेळी निवडून देतो त्यावेळी त्याच्या मागे एवढी मोठी ताकद उभी राहते.
स्वत: मोदी, अमित शाह (Amit Shah), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्या मागे उभे राहतात.
कारण हा माझ्या पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे त्यांना पाहिजे ते मिळते. धंगेकर काय करणार, काय विकास निधी आणणार,
कोण विकास निधी देणार, त्यांचे कायदा विषयातले ज्ञान काय, कायदा कशासोबत खातात हे त्यांना माहिती आहे का,
त्यामुळे व्यक्ती म्हणून कोण चांगले आहे याला काही महत्व नसल्याचे सांगत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypool Election | Win Hemant Rasane to win an important topic like old palace questions, Gunthawari – Chandrakant Patil (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ