Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 टक्के तर कसब्यात 45.25 टक्के मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) महाविकास आघाडीचे रवींद्र धगेकर (Ravindra Dhagekar) विरुद्ध भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात मुख्य लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap), राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दुपारी तीननंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 टक्के तर कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले.

कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी
(Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 यावेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 यावेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 यावेळेत 20.68 तर 1 ते 3 यावेळेत 30.55 टक्के, 3 ते 5 यावेळेत 41.1 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 यावेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 यावेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 यावेळेत 18.50 तर 1 ते 3 यावेळेत 30.05 टक्के, 3 ते 5 या वेळेत 45.25 टक्के मतदान झाले आहे.

कसबा, चिंचवड मधील मतदारांची संख्या

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 8 फेब्रुवारी 2023 रोजी 8 लाख 44 हजार 633 मतदार आहेत.
यामध्ये चिंचवडमध्ये 5 लाख 68 हजार 954 तर कसब्यात 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत.
यामध्ये चिंचवडमध्ये पुरुष मतदारांची (Male Voters) संख्या 3 लाख 2 हजार 946 तर
कसब्यात 1 लाख 36 हजार 984 इतकी आहे. तसेच चिंचवडमध्ये महिला मतदारांची (Female Voters) संख्या
2 लाख 65 हजार 974 तर कसब्यात 1 लाख 38 हजार 690 इतकी आहे. याशिवाय चिंचवडमध्ये 34 तर
कसब्यात 5 तृतीयपंथी मतदार आहेत. चिंचवड मतदारसंघात 80 वर्षावरील मतदार संख्या 9 हजार 926 तर
कसब्यात 19 हजार 244 इतकी आहे.

2 मार्चला मतमोजणी

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी होणार आहे.
कसब्यातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील वखार महामांडळाच्या गोदामात होणार आहे.
तर चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव येथे होणार आहे.

Web Title :-  Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | 41.1 percent polling in Chinchwad and 45.25 percent in Kasbaya till 5 o’clock