Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून भाजपने (BJP) बालेकिल्ला राखण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी पुण्यात आणले आहे. अशातच कसबा आणि चिचंवड पोटनिवडणुकीतील (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) शिवसेना (Shivsena)-भाजपचे उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील प्रचारात सहभागी झाले आहेत.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवार (दि.24) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुती (BJP-Shiv Sena Alliance) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. दोन्ही बाजूने महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.22) मध्यरात्री दोन वाजता स्वारगेट येथील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना महायुतीचे कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा शंभर टक्के जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शहर प्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) यांच्या अग्रहास्तव पुणे शहर कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते चांगले काम करत आहेत.
कसबा मतदारसंघ हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला आहे.
याठिकाणी आमचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) शंभर टक्के प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत.
तसेच चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात भगवं वादळ पाहायला मिळालं.
त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शंभर टक्के प्रचंड
बहुमाताने जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | cm eknath shinde on kasba chinchwad by elelcation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून आधी त्यानं फसवलं, नंतर परिचयातील व्यक्तीने 7.5 लाखांना गंडवलं; पिंपरी परिसरातील घटना

MLA Rohit Pawar | ‘शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, लागलात तर तुमचं…’, रोहित पवारांचा सूचक इशारा