Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | भाजप आमदार मुक्ता टिळक (BJP MLAs Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेचे मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाला आहे. येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. याठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली आहे. परंतु या निवडणुकीत मनसेची (Pune MNS) काय भूमिका असणार, मनसे भाजपला (BJP) पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

 

कसबा पेठ मतदारसंघात आणि चिंचवड मतदारसंघात मनसेने भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर कसब्यात हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी दिली आहे. प्रचाराची सुरुवात झाली असताना मनसेने कोणालाच पाठिंबा दिला जाहिर केला नव्हता. अखेर मंगळवारी मनसेने चिंचवड आणि कसब्यात भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) चिंता वाढली आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

 

मनसे प्रचारात सहभागी होणार नाही
मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झालीय. मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर (Babu Vagaskar) यांनी दिली. भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा (MNS Chief Raj Thackeray) आहे. वरिष्ठ स्तरावर बोलणं झाल्याचे वागस्कर यांनी सांगितले.

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी मंगळवारी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
भाजप नेते मनसेच्या नेत्यांच्या भेटीला गेले होते. पुण्यातील भाजप (Pune BJP) नेते मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि
माधूरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी मनसे नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत
कसबा पोट निवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
तर कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
त्यामुळे कसब्यात धंगेकर आणि रासने यांच्या थेट लढत होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली आहे.
तर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | mns will support bjp in kasba and chinchwad by election raj thackeray news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

Mumbai Heat Wave | मुंबई, पुण्यासह कोकणात पुढच्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश