Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. चिंचवडची जागा भाजपला (BJP) तर कसब्याची जागा मविआने (Mahavikas Aghadi) जिंकली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत आपणच विजयी होणार असा दावा करणारे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rebel Candidate Rahul Kalate) यांचे डिपॉझिट जप्त (Deposit Seized) झाले आहे. राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली असून, डिपॉझिट राखण्यासाठी 47 हजार 833 मतांची आवश्यकता होती. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

 

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजार 168 मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीचे नाना काटे (Nana Kate) यांचा बंडखोर राहुल कलाटे यांच्यामुळे पराभव झाला. कलाटेच काटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा दावा मविआने केला आहे. मी जनतेच्या मनातील आमदार आहे, असा दावा करणाऱ्या कलाटेंना डिपॉझिटही वाचवता आले नाही. कलाटे यांच्यासह 26 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या 1/6 टक्के म्हणजेच 16.66 टक्के मते मिळवू शकला नाही, तेव्हा त्याची अमानत रक्कम जप्त केली जाते. चिंचवडमध्ये नाना काटे यांना 1/6 टक्के मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होणार नाही. तर कलाटे यांना डिपॉझिट वाचवण्यासाठी 3 हजार 751 मतांची गरज होती.

कसब्यात 14 जणांचे डिपॉझिट जप्त
कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या रिंगणात 16 उमेदवार होते. त्यापैकी 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
यामध्ये अभिजीत बिचुकलेचा (Abhijeet Bichukle) देखील समावेश आहे.
बिचुकलेला 47 मतं पडली असून डिपॉझिट वाचवण्यासाठी त्यांना 23 हजार मतांची आवश्यकता होती.
भाजपचे हेमंत रासने (BJP Hemant Rasane) यांना 1/6 मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होणार नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार तर एससी आणि
एसटी वर्गातील उमेदवारांना 5 हजार रुपये जमा करावे लागतात.

 

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | pune bypoll election 2023 mahavikas aghadi rahul kalate deposits got forfeiture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट