Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाच’; पुण्यात मनसे-राष्ट्रवादीच्या ट्विटर वॉरची जोरदार चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत मनसेकडून (Pune MNS) निवडणूक लढवणाऱ्या इच्छूकांची संख्या मोठी होती. मात्र, कसब्यात मनसेने उमेदवार न देता भाजपला (BJP) पाठिंबा दिला. मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मनसेची खिल्ली उडवत टीकास्त्र सोडले आहे. तर राष्ट्रवादीच्या टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेस (Congress) यांच्यात थेट लढत होत असताना मनसे आणि राष्ट्रवादीत जोरादर जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)
मुंबईमध्ये मनसे पुणे शहर कार्यकारिणीची राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यायचा, मात्र प्रचारात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी बुधवारी ट्विट करुन मनसेची खिल्ली उडवली. कोथरुड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आते कसब्यात भाजपला पाठिंबा देताय. बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागले. अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. तसेच साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा-एक मंदसैनिक असं देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)
कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय…
बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत.#नवनिर्माणम्हणे— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 14, 2023
साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा. – एक निराश मंदसैनिक
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
जगताप यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी जगताप यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. बाबर यांनी ट्विट करुन म्हटले ‘लग्न लोकाचं प्रशांत जगताप नाचतंय येड्या भो..चं’ असं ट्विट करत साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये सुरु झालेले हे ट्विटर वॉर इथेच थांबले नाही.
लग्न लोकाचं @JagtapSpeaks नाचतंय येड्या भो..च#कसबाविधानसभापोटनिवडणूक
— साईनाथ बाबर Sainath Babar (@Sainathbabar7) February 15, 2023
प्रशांत जगातप यांनी बाबर यांच्या ट्विटला रिप्लाय करत म्हटले ‘साईनाथ,
साहेबाचा उरलेला पेग चोरुन पिलास का बाळा? शुद्धीवर ये तुझ्या साहेबांनी सुपारी घेतली आहे.
तू फक्त मन लावून नाचायचं काम कर’ असे म्हटले आहे.
मनसे आणि राष्ट्रवादीच्या या ट्विटर वॉरची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पुण्याच्या निवडणुकीत लढाई दुसऱ्याची आणि भांडतय तिसराच असे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.
साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये.
तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. https://t.co/K9RBwu7Q0T— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | pune kasba peth bypoll ncp prashant jagtap vs mns sainath babar twitter war raj thackeray ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका
Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना