Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | त्यांना वेगळं दिसलं असेल म्हणून शरद पवारांना प्रचारात उतरवलं; अजित पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रोड शो केले. यावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रोड शो करताना पाहिले नाही.यांना काहीतरी वेगळा अंदाज आला असावा यासाठी रोड शो करत असल्याची टीका त्यांनी केली होती. अजित पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, असं काहीही नाही. मागच्या सर्वच पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. राष्ट्रवादीने (NCP) शरद पवारांपासून (Sharad Pawar) सगळ्या नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. याचा अर्थ त्यांना काहीतरी वेगळं दिसत असेल म्हणून त्यांना प्रचारात उतरवले असेल. यापूर्वीच्या पोटनिवडणुकीत शरद पवार गेल्याचे दिसले नाही. मात्र या पोटनिवडणुकीत ते प्रचारसाठी गेले. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेयची असते. मतं मागण्यासाठी जाणं यात लाज काय वाटयची, आम्ही मतं मागतोय, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.
ही पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात होत असून
महाविकास आघाडीने उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेसचे नाना पटोले
(Congress Nana Patole) , बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), प्रणीती शिंदे (Praniti Shinde)
यांनी कसबा आणि चिंचवडमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला.
तर भाजप-शिवसेना महायुतीच्या (BJP-Shiv Sena Alliance) उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील महत्त्वाचे नेते पुण्यात तळ ठोकून आहेत.
दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपली
प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | Sharad Pawar was campaigned to see them differently; Fadnavis’s response to Ajit Pawar’s criticism (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना

Mumbai Crime News | इन्स्टा मैत्री पडली महागात ! पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने मित्राने महिलेला 2 लाखात विकले