Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | पोटनिवडणूकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन; कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे यांच्यासह 5 जणांची नियुक्ती

0
203
Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | Establishment of media certification and control committee for by-elections; Appointment of 5 persons including Election Returning Officer of Kasba Peth and Chinchwad, Journalist Anil Sawle
file photo

पुणे : Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५-चिंचवड आणि २१५-कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) स्थापन करण्यात आली आहे. (Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election)

समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-१ येथे सुरु झाले आहे. तेथील दूरध्वनी क्रमांक ०२०- २६१२१३०७ असा आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून कसबा पेठ व चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार अनिल सावळे (Journalist Anil Sawle), उपसंचालक (माहिती) डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर (Deputy Director (Information) Dr. Purushottam Patodkar), पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार (Deputy Director Mahesh Iyengar), पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार (PSI Amol Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे (DIO Dr. Kiran Moghe) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावतीने प्रचारासाठी समाजमाध्यम, दूरचित्रवाणी वाहिन्या, आकाशवाणी, स्थानिक केबल वाहिन्यांवर देण्यात येणाऱ्या जाहिराती या कार्यक्रम संहिता आणि जाहिरात संहितेप्रमाणे असल्याबाबत लक्ष ठेवण्यात येते. तसेच निवडणूक प्रचारासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठी जाहिरात तपासणीचे कामही समिती करते. मतदानाचा दिवस व त्यापूर्वीचा एक दिवस वर्तमानपत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या जाहिरातीदेखील या समितीकडून प्रमाणित करून घेणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. एसएमएस, वृत्तपत्राच्या ई-आवृत्त्या, विविध न्यूज पोर्टल आदी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावरील निवडणूक विषयक जाहिरातींचे निरीक्षणही समितीच्या कार्यकक्षेत येते.

समिती पेड न्यूज प्रकरणे तपासणे व त्याबाबतची उचित कार्यवाही करण्याचे कार्यही करते.
जिल्हास्तरीय समितीकडे निवडणूक जाहिरातीच्या प्रमाणीकरणासाठीचे अर्ज स्वीकारले जातील.
समितीमार्फत जाहीरातीची तपासणी होऊन संबंधितास प्रमाणिकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येते.
प्रमाणीकरणानंतर जाहिराती इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर प्रसारित करता येतील असे,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कळविले आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | Establishment of media certification and control committee for by-elections; Appointment of 5 persons including Election Returning Officer of Kasba Peth and Chinchwad, Journalist Anil Sawle

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’