Pune Katraj Vikas Aghadi | कात्रजकरांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्‍यांसमवेत 8 जून रोजी कात्रज विकास आघाडीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Vikas Aghadi | कात्रज येथील उड्डाणपुलाचे (Katraj Flyover Bridge) डिझाईन चुकले असून हा उड्डाणपूल बांधल्यानंतरही कात्रजकरांची वाहतूक कोंडी (Katraj Traffic Jam) आणि अपघातांपासून सुटका होणार नाही. यासह कात्रजकर अनेक समस्यांनी व्यापले असून या त्रासांतून सुटका व्हावी यासाठी कात्रज विकास आघाडीच्यावतीने ८ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता कात्रज भाजी मंडई (Katraj Bhaji Mandai) येथे आमदार, खासदार आणि प्रशासनातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे (Janta Darbar) आयोजन केले आहे. किमान यानिमित्ताने सर्वांचे एकमत होउन कात्रजकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘दिशादर्शक’ मार्ग निघावा, ही यामागची भूमिका आहे, अशी माहीती कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर (Nimesh Babar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Katraj Vikas Aghadi)

 

बाबर यांनी सांगितले, की या जनता दरबाराला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe), आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), माजी आमदार योगेश टीळेकर (Former MLA Yogesh Tilekar), महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्यासह वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

 

कात्रजची सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात आहे. आतापर्यंत याठिकाणी ३०० जणांचा अपघाती मृत्यू झाला (300 Deaths In Accident In Katraj) असून जायबंदी झालेल्यांची संख्या हजारांमध्ये आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्यावतीने National Highways Authority of India (NHAI) वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यान (Wondercity and Rajas Society Chowk) बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे नियोजन चुकले असून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. भविष्यातील मेट्रोचा विचार न करताच या पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कात्रज कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhwa Road) रुंदीकरण करण्याऐवजी वंडरसिटी ते खडीमशीन चौकापर्यंत (Wondercity to Khadi Machine Chowk) उड्डाणपुल बांधल्यास भूसंपादनासाठी आवश्यक असलेला सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी वाचणार असून अवजड वाहनांना देखिल निर्धोक प्रवास करता येणार आहे. (Pune Katraj Vikas Aghadi)

Advt.

कात्रज गाव पुर्वीपासून महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) असून महापालिकेने विकास आराखडा (Pune PMC Development Plan) तयार केला आहे. परंतू सभोवतालच्या ग्रामपंचायती नव्याने महापालिकेत आल्या आहेत, त्याचा आराखडा (PMC DP) पीएमआरडीए (PMRDA) करत आहे. दोन वेगळ्या संस्थांऐवजी एकाच संस्थेने आराखडा तयार करून कात्रज करांना रुग्णालय,
खेळांचे मैदान यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच समाविष्ठ गावातील पाणी योजना,
कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कात्रजकर अनेक वर्षे महापालिकेला उत्पन्न देत आहे,
मात्र महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडूनही कात्रजकरांना कुठलेच सकारात्मक उत्तर मिळत नाही.
यामुळेच विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासनापुढे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरी समस्या सोडविण्याची मागणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याप्रसंगी गणेश मोहीते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :  Pune Katraj Vikas Aghadi | Janata Durbar organized by Katraj Vikas Aghadi on 8th June along
with representatives of the people and administration officials to present the problems of Katrajkars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा