Pune Kedar Jadhav Father Found | भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता, ‘या’ परिसरात सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kedar Jadhav Father Found | भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता झाले असल्याची माहिती आता समोर आली होती. याबाबतची तक्रार कोथरूड पोलिसांकडे (Kothrud Police Station) दाखल करण्यात आली आली आहे. मात्र, आता केदार जाधव यांच्या वडिलांचा शोध (Pune Kedar Jadhav Father Found) लागला आहे. ते मुंढवा परिसरातच सापडले आहेत.

 

क्रिकेटर केदार जाधव यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर केदार जाधव यांच्या वडिलांना मुंढवा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. केदारचे वडील महादेव जाधव (वय 85) सोमवारी (दि. 27) सकाळी 11.30 वाजता ते घरातून फिरायला बाहेर पडले. पण त्यानंतर ते घरी परतलेले नाहीत. सिटी प्राईड कोथरूड येथुन रिक्षात बसुन सकाळी घराबाहेर पडले होते.

 

केदार जाधव यांच्या वडिलांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत.
त्यामुळे जाधव कुटुंबिय हे त्यांना आजारपणामुळे घराबाहेर पाठवत नाहीत.
दरम्यान, सोमवारी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते.
ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले.
कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नसल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात (Alankar Police Station) तक्रार दाखल केली.

 

Web Title :- Pune Kedar Jadhav Father Found | Indian cricketer Kedar Jadhav’s father is missing, found in Mundhwa area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार