Pune Khadak Police | रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटणारी टोळी खडक पोलिसांकडून गजाआड (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Police | रात्रीच्या वेळी दुचाकीवरुन जाणाऱ्यांना मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीला (Gang Arrested In Robbery Case) खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून सोन्याची चेन व दोन दुचाकी असा एकूण एक लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई घोरपडे पेठेतील (Ghorpade Peth) मंत्रा हॉटेलच्या (Mantra Hotel) बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली. (Pune Khadak Police)

याबाबत रमेशकुमार गिरधारीलाल घाची (वय-28 रा. कोंढवा) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी 29 मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास बोंबील मार्केट (Bombil Market Pune) समोरील सार्वजनिक रोडवरुन घरी जात होते. त्यावेळी तीन जणांनी फिर्यादी यांची दुचाकी आडवली. आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच जबरदस्तीने गळ्यातील 80 हजार रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरुन नेली. याप्रकरणी अभिषेक दशरथ वाघमारे उर्फ मम्या (वय-22 रा. वजगाव ब्रु), मयुर किरण भोसले (वय-19 रा. दांडेकर पुल), सुदर्शन विजय मोठे (वय-23 रा. दांडेकर पुल) यांच्यावर आयपीसी 392, 341, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व प्रमोद भोसले यांना माहिती मिळाली की, जबरी चोरी करणारे घोरपडे पेठेतील मंत्रा हॉटेलच्या मागील बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत आले आहेत. मिळालेल्या माहितीची खात्री करुन पोलिसांनी सापळा रचून अभिषेक वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मयुर भोसले व सुदर्शन मोठे यांना सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चोरलेली सोन्याची चेन व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (Pravin Pawar IPS), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (Pravinkumar Patil IPS), पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड (PI Ravindra Gaikwad),

पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत (PI Sampatrao Raut), सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik), पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे (PSI Prahlad Dengle), अजीज बेग (PSI Ajij Beg), पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रशांत बडदे, लखन ढावरे, रफिक नदाफ, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, चंद्रशेखर खरात, प्रवीण गावीत, सुहास साळुंके यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)