Pune Khadakwasla Dam | पर्यटकांना खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर (tourist places in Pune district) गर्दी वाढत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी शुक्रवारी (दि.16) जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धरणांचा परिसर, गड किल्ले इत्यादी ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 144 लागू केले आहे. असे असताना खडकवासला (Pune Khadakwasla Dam) परिसरामध्ये बेफिकीर पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हवेली पोलिसांनी (Haveli police) खडकवासला धरणापासून (Pune Khadakwasla Dam) पुढे जाऊ न देता पर्यटकांना परतावून लावण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. नियम मोडून आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना केल्या जाता आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कलम 144 लागू केले आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील (Haveli taluka) खडकवासला धरण (Khadakwasla Dam), डोणजे (donje), घेरा, सिंहगड, सिंहगड किल्ला (Sinhagad fort) या ठिकाणी हा नियम लागू करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांनी (Haveli Police) खडकवासला धरण चौपाटीवर (khadakwasla Dam chowpatty) नाकाबंदी केली आहे.

 

45 हजारांचा दंड वसूल

शहरी हद्दीत कोणतीही तपासणी होत नसल्याने पर्यटक बिनदिक्कत ग्रामीण हद्दीत येत आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
सकाळपासून 89 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
सुमारे 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे,
अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar) यांनी दिली.

Web Titel :- Pune Khadakwasla Dam | ban going beyond khadakwasla dam tourism police coverage

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट