Pune Crime News | पैशांच्या व्यवहारातून दोघांचे अपहरण करुन केली मारहाण, मध्यरात्री रंगला होता थरार; सिंहगड रोड पोलिसांनी कोल्हापूरच्या आरोपींना केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पैशाच्या व्यवहारातून दोघांचे अपहरण (kidnapping) करुन त्यांना मारहाण करुन १० लाखांची मागणी केली. सिंहगड रोड पोलिसांनी (sinhagad police station) मध्यरात्रीत कारवाई करुन कोल्हापूरच्या (Kolhapur) दोघांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे यात ज्यांचे अपहरण (kidnapping) केले, तो केवळ ज्याच्याबरोबर पैशांचा व्यवहार होता, त्यांच्या ओळखीचा होता.

अविनाश पांडुरंग पाटील (वय ३१) आणि उत्तम तुरंबेकर (वय ३१, दोघे रा. बेकनाळा, गडहिंग्लज, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी निखिल उदय गुरव (वय २६, रा. नर्‍हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

निखिल गुरव हे प्रभात तोडकर यांच्याबरोबर नर्‍हे (narhe ambegaon) येथे राहतात. गडहिंग्लज येथील हे सर्व ग्रामस्थ आहेत. आरोपींनी त्यांच्याशी संबंधित संदीप पाटील यांना १० लाख रुपये दिले होते. त्यासाठी त्याने आपले घर लिहून दिले होते. पाटील पैसे देत नव्हता व त्याचे पुण्यातील घर (Home in Pune) आरोपींना माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांना ओळखलेल्या अजित राऊत याला धमकावून त्याचे घर सांग असे सांगितले होते. त्यानंतर परवा रात्री त्यांनी प्रभात तोडकर व अजित राऊत याचे अपहरण (kidnapping) केले. त्यांना संदीप पाटील याचे घर दाखव, असे सांगून मारहाण केली. दरम्यान, त्यांनी ही बाब निखिल गुरव यांना सांगून तुम्ही १० लाख रुपये आणून द्या अशी मागणी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

नाहीतर या दोघांना मारुन टाकू अशी धमकी दिली. गुरव यांनी तातडीने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware) यांना कळविली. घेवारे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे (Assistant Inspector of Police Prashant Kanase), पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे (Police Sub Inspector Amol Kale), नितीन जाधव, कुलदीप संकपाळ व इतरांचे पथक तयार करुन आरोपींच्या शोधाचे आदेश दिले. हे पथक खासगी गाडीतून फिर्यादीला घेऊन रवाना झाले. आरोपींनी त्यांना पैसे घेऊन वाकड (Wakad) येथील पुलाजवळ बोलावले.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी याने पैसे घेत येत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पहाटे साडेचार वाजता या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अपहरण केलेल्या दोघांविषयी चौकशी केल्यावर त्यांनी दोघांना जवळ ठेवले होते.
प्रभात आणि अजित यांना इतकी मारहाण केली होती की त्यांना चालताही येत नव्हते.
प्रभात तोडकर यांच्या डोक्यात बाटली मारुन जखमी केले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | The two were abducted and beaten in a money transaction
Sinhagad Road police arrested the accused from Kolhapur

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद