Pune Kidney Transplant Case | किडनी प्रत्यारोपणाच्या प्रकरणाला नवे वळण, एंजंटनीच तयार केले बनावट गिऱ्हाईक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kidney Transplant Case | पुण्यातील रुबीहॉल (Ruby Hall Clinic) मध्ये बनावट किडनी प्रत्यरोपणाच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. बनावट किडनी प्रत्यारोपणाच्या पाच केसेस समोर आल्या असून पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, अभिजित गटने (Abhijit Gatne) आणि रवींद्र रोडगे (Ravindra Rodge) या दोन एजंटने बनावट गिऱ्हाईक तयार केले असल्याची माहिती समोर (Pune Kidney Transplant Case) आली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोन एजटंने 8 ते 9 जणांचे बनावट किडनी प्रत्यारोपण केले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक, इनामदार हॉस्पिटल (Inamdar Hospital), ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल (Jupiter Hospital Thane) आणि कोईंबतूर येथील हॉस्पिटलमध्ये (Coimbatore Hospital) हे एजंट बनावट गिऱ्हाईक बनवून पाठवत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलीस किडनी दान (Kidney Donation) करणारे आणि बनावट गिऱ्हाईक असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात (Pune Kidney Transplant Case) पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेज ग्रँट (Ruby Hall Hospital Managing Director Dr. Parvez Grant), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी (Legal Advisor Manjusha Kulkarni) यांच्यासह 15 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणामध्ये डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन Rebecca John
(डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सर्व्हिसेस -Deputy Director Medical Services),
डॉ. भूपत भाटी Dr. Bhupat Bhati (युरोलॉजिस्ट-Urologist), डॉ. हिमेश गांधी Dr. Himesh Gandhi (युरोलॉजिस्ट),
सुरेखा जोशी Surekha Joshi (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर -Transplant Coordinator)
यांच्यासह अमित साळुंखे (Amit Salunkhe), सुजाता साळुंखे (Sujata Salunkhe),
सारिका सुतार (Sarika Sutar), आण्णा साळुंखे (Anna Salunkhe), शंकर पाटील (Shankar Patil),
सुनंदा पाटील (Sunanda Patil), रवी गायकवाड (Ravi Gaikwad), अभिजित मदने (Abhijit Madane)
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक (Deputy Director of Medical Services, Pune) डॉ. संजोग कदम (Dr Sanjog Kadam) यांनी फिर्याद दिली असून आरोपींवर फसवणूक (Cheating) व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (Human Organ Transplant Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Kidney Transplant Case | pune ruby hall clinic illegal kidney transplant case news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त