पुण्यातील सॅलेसबरी पार्क जवळुन कोकेनचा मोठा साठा जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील सॅलेसबरी पार्क जवळील मंत्री इस्टेट सोसायटीच्या पुना इंटरपायझेस शॉप नंबर 15 च्या समोरील रस्त्यावरून एका नायजेरियन युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कोकेनचा मोठा साठा जप्‍त करण्यात आला आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. नायजेरियन युवकाविरूध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B00OWHO3VO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0178200f-a8fa-11e8-978f-7f04012b9030′]

अ‍ॅन्टोनी मॅक्सवेल उर्फ ऊगुचुकु इमॅम्यएल (35, मुळ रा. नायजेरिया, सध्या रा. मंत्री इस्टेट इमारतीच्या मागे, यासीनजुग दर्गा रोड, सॅलेसबरी पार्क) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 2 हजार 120 रूपये किंमतीचे 58.510 ग्रॅम वजनाचे कोकन, डिजीटल वजनकाटा, मोबाईल आणि रोख रक्‍कम असा एकुण 7 लाख 38 हजार 120 रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे. आरोपी अ‍ॅन्टोनीकडे मोठया प्रमाणावर कोकेनचा साठा असल्याची माहिती लष्कर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शैलेश जगताप यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांना दिली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्‍त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, सहाय्यक निरीक्षक अविनाश शिंदे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सॅलेसबरी पार्क जवळ सापळा रचुन आरोपी अ‍ॅन्टोनीला अटक केली. त्याच्याकडून 7 लाख 2 हजार 120 रूपये किंमीचे कोकेन जप्‍त करण्यात आले. आरोपीला रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीकडे एवढया मोठया प्रमाणावर कोकेन कोठुन आले, त्याचे कोण साथीदार आहेत काय आणि तो त्याच्याकडील कोकेन कोणाला विकणार होता अथवा कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे करीत आहेत.