Pune : कोलकत्ता नाईट रायडर संघातील राहुल त्रिपाठीला पुणे पोलिसांकडून ‘फाईन’; वसूल केला 500 रूपयांचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मास्क न घालता फिरत असलेल्या नागरिकांवर जोरदार कारवाई करत असून, त्याचा अनुभव आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर टीमचा खेळाडूला देखील आज आला आहे. क्रिकेटर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोंढव्यात ही कारवाई केली आहे.

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

कोंढवा पोलिसांचे एक पथक खडीमशीन चौकात नाकाबंदी करत होते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. तर मास्क न घालणाऱ्यावर कारवाई केली जात होती. यावेळी त्यांना चारचाकीत एक व्यक्ती विना मास्क असल्याचे दिसले. त्यांनी ही गाडी बाजूला घेतली व त्यांना मास्क का घातला नाही, असे म्हणत दंड भरावा लागेल असे सांगितले. अचानक कारवाई करत असताना कार चालक हा प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी असल्याचे लक्षात आले. तरीही पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलीच. राहुल त्रिपाठी Rahul Tripathi हा खडकीच्या दिशेने जात होता. पोलिसांच्या या धडक कारवाईने आज पोलिसांचे कौतूक होत असून, कोणीही असला तरी नियमभंग केल्यास कारवाई केलीच जाईल, असे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे. नुकतीच त्यांनी माजी मंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर देखील कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीवर बसून जेवणाचे ‘हे’ ४ फायदे, जाणून घ्या

राहुल त्रिपाठी हा कोलकत्ता नाईट रायडर संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. 2020 साली कोलकत्ता नाईट रायडर टीमने त्याला विकत घेतले होते. तेव्हापासून तो केकेआर टीमचा प्रमुख फलंदाज बनला होता. या आधी तो पुणे रायझिंग आणि राजस्थान संघासाठी आयपीएल मध्ये खेळत होता.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय