मुस्लीम बांधवांनी नमाज पठण घरीच करावे, पुण्यातील कोंढवा पोलीसांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन केले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.24) मुस्लीमांचा रमजान ईद हा सण असून मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरामध्येच नमाज पठण कारवे असे आवाहन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मुस्लीम बांधवांना केले आहे.

कोंढवा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन आवाहन केले आहे…
1. सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण हे आपापल्या घरीच करावे कोणीही एकत्र येऊन नमाज पठण.करू नये
2. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मशिदी मदरसा या बंद राहतील मशिदीमध्ये फक्त मौलाना साहेब व मशिदीचे साफ सफाई करणारे यांनाच प्रवेश राहील इतर कोणीही मशिदीमध्ये जाऊ नये माननीय पोलिस सह आयुक्त साहेब यांनी मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत
3. मशिदीचे बाहेर सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कोणीही नमाज पठण करू नये.
4. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व तीव्रता लक्षात घेता सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद नमाज पठण घरी अदा केल्यानंतर आपल्या नातेवाईक व मित्रांना प्रत्यक्ष न भेटता कोरोणा विषाणूचा धोका टाळण्यासाठी आपले मित्र नातेवाईक यांना फोनद्वारे किंवा व्हिडीओ कॉलिंग द्वारे रमजान सणाच्या शुभेच्छा द्याव्यात सर्व मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सींगचे पूर्ण काटे कोरपणे पालन करावे ही विनंती आहे.