पुण्यातील ‘या’ परिसरातील 3000 कुटूंबियांचा मतदानावर ‘बहिष्कार’ ?

कोंढवा (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – मागील तीस वर्षांपासून पिण्याचे पाणी विकत घेणाऱ्या कोंढाव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच नागरिकांनी झळकवले असून ‘स्मार्ट’ पुण्याचा फुगा फोडला आहे.

हडपसर मतदार संघामध्ये कोंढवा येथे असलेल्या एनआयबीएम परिसराचा मागील काही वर्षात झपाट्याने विकास झाला आहे. याठिकाणाच्या पॉश सोसायट्यांमध्ये 10 हजारहून अधिक नागरिक राहतात. परंतु अवेळी आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे स्मार्ट पुण्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. येथील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी यंदा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगणारे लोकप्रतिनिधी पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले आहे.

Visit : Policenama.com