Pune Kondhwa Crime | उपचारासाठी पुण्यात आलेल्या ‘येमेन’च्या नागरिकांना लुबाडणारी टोळी कोंढवा पोलिसांकडून गजाआड

पुणे ते दमण मार्गावरील 600 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी करुन आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | उपचार घेण्यासाठी अनेक परदेशी नागरिक पुणे शहरात येत असतात. यामध्ये येमेन या देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. याच संधीचा फायदा घेऊन येमेन येथून आलेल्या नागरिकांसोबत अरबी भाषेत बोलून त्यांचा विश्वास संपादन करुन किंवा पोलीस असल्याची बतावणी करुन लाखो रुपये लुटण्याऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली. घटना घडल्यानंतर कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने साडेदहा तासात 350 किमीचा प्रवास करीत 600 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.(Pune Kondhwa Crime)

सिंकदर अली खान (वय ४४, रा. राजदूत हॉटेल जवळ, दक्षिण दिल्ली), करिम फिरोज खान (वय २९, रा. कस्तुरबा नगर, लाजपतनगर, दक्षिण दिल्ली), इरफान हुसेन हाशमी (वय ४४, रा. राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा, दक्षिण दिल्ली), मेहबुब अब्दुलहमदी खान (वय ५९, रा. राजदुत हॉटेल जवळ, जंगपुरा, दक्षिण दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सालेह ओथमान एहमद (वय ५२, मुळ रा. येमेन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भादवि कलम १७०, ४१९, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ३ हजार अमेरीकन डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजार रुपयांचे भारतीय चलन व कार जप्त करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशातून पुणे
शहरात उपचारासाठी आलेले बहुतांश नागरिक कोंढवा परिसरात वास्तव्य करतात.
त्याचा पेहराव वेगळा असल्याने अशा नागरिकांना हेरून लुबाडण्यात येत होते.
फिर्यादी सालेह एहमद हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते.
8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आशिर्वाद चौकातून पत्नी समवेत जात होते. त्यावेळी एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली. गाडीत बसलेल्या व्यक्तिंनी सालेह यांच्यासोबत अरबी भाषेत संभाषण करुन त्यांना पोलीस असल्याचे सांगितले.

गाडीत बसलेल्या व्यक्तींनी सालेह यांच्याकडी वस्तू व ओळखपत्र पडताळणी करायची असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यांना ओळखपत्र दाखवण्यासारखे केले. सालेह यांनी त्यांच्याजवळ असलेले कागदपत्रे, पैसे गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे दिली. गाडीतील व्यक्तीने कागदपत्र व नोटांचा वास घेत तपासणी करत असल्याचे सालेह यांना भसवले. त्यानंतर काही समजण्याच्या आत आरोपींनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली.आरोपींनी फिर्यादी सालेह यांच्याकडील 500 सौदी रियाल, 3 हजार अमेरिकन डॉलर, भारतीय चलनातील 53 हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना
आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. आरोपी एमएच 12 इजी 4266 या गाडीतून आले व फर्यादी यांना लुबाडून पळून
गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी खडीमशीन चौक मार्गे कात्रज- नवले ब्रीज -वारजे- डुक्कर खिंड-बाणेर- हिंजवडी
येथील एनपीआर कॅमेऱ्यांची पाहणी केली. याठिकाणी आरोपींनी गाडीचा नंबर बदलला. त्यावर डीएल 4 सी, एएच 4960
अशी नंबर प्लेट लावली.

सीसीटीव्हीच्या माध्यमातुन ही गाडी तळेगाव उर्से टोलनाक्यावरून खालापुर टोल नाका- ते नवी मुंबई ते तुर्भे- ठाणे- पालधर -खणीवडे टोलनाका, चारोटी टोल नाका- डहाणू- घोलवड- गुजरात राज्याच्या हद्दीतुन केंद्र शासित प्रदेश दमण याठिकारणी गेल्याचे समोर आले.
पोलिसांनी या फुटेजच्या आधारे दमन येथील देवका समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल सिल्टॉन 9 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे तीन वाजता आरोपी पोचल्याचे निष्पन्न केले.
या हॉटेलवर आरोपींनी मुक्काम केला होता. पोलिसांनी आरोपींच्या ओळखपत्रांची माहिती घेऊन ताब्यात घेतले.
घटना घडल्यापासून साडेदहा तासात ३५० किलोमीटरचा प्रवास करीत ६०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेज तपासत
आरोपींना गजाआड केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक