Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी वस्तूने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन एका तरुणासोबत वाद घातले. वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) सकाळी नऊच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील पिकासो पॅराडाईज सह्याद्री पार्क येथे घडली आहे.(Pune Kondhwa Crime)

याबाबत राजकुमार खारातीराम जोशी (वय-76 पिकासो पॅराडाईज सह्याद्री पार्क, साळुंके विहार, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रुपेश अग्रवाल व राजेंद्र अग्रवाल (रा. पिकासो पॅराडाईज सह्याद्री पार्क, साळुंके विहार, कोंढवा खुर्द) यांच्यावर आयपीसी 326, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एका सोसायटीत राहतात. सोसायटीचा वॉचमन हा फिर्यादी यांच्या मुलाची गाडी धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी त्यांची चारचाकी गाडी घेऊन सोसायटीच्या बाहेर जात होते. गेट न उघडल्याच्या कारणावरुन आरोपींनी आरडाओरडा करुन वॉचमनला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्याकडे बघून त्याला कोणी पाठवले असे म्हणून शिवीगाळ केली.

फिर्यादी यांनी शिवीगाळ का करता अशी विचारणा केली. त्याचवेळी फिर्यादी यांचा मुलगा त्याठिकाणी आला.
आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलासोबत वाद घालून त्याच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली.
त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा व आरोपी यांच्यात झटापट सुरु झाली.
भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी वस्तू फिर्यादी
यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना