Pune Kondhwa Crime | तरुणीचा पाठलाग करुन भररस्त्यात मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | तरुणीचा पाठलाग करुन लग्नाची मागणी घातली. तसेच लग्न केले नाही तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणी मैत्रिणीला भेटून घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये अडवून शिवीगाळ करुन तिच्या छातीत लाथा मारुन गैरवर्तन केले. तरुणीला मारहाण करुन विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Kondhwa Crime)

याबाबत महंमदवाडी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.8) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन संतोष गुच्चप्पा कांबळे (वय-23 रा. महंमदवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.7) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तु मला खुप आवडते, तुझ्याशिवाय मला या जगात कोणी नाही. आपण दोघे लग्न करु, तु माझ्यासोबत बोल, नाहीतर मी मरुन जाईल अशी धमकी आरोपीने दिली. पीडित तरुणी बुधवारी तिच्या सोमजी गावातील मैतिणीला भेटून घरी जात होती.

त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यामध्ये अडवून कुठे गेली होती अशी विचारणा केली.
तिने मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्याचे सांगितले असता आरोपीने मला विचारुन का गेली नाहीस? असे म्हणून शिवीगाळ केली.
तसेच तिच्या हातातील मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला. यानंतर तरुणीच्या छातीवर लाथा मारुन तिला जखमी केले.
तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Abhishek Ghosalkar | अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेकवर गोळीबार ! मेहूल पारेख, रोहित साहू यांना घेतले ताब्यात, आणखी एक पिस्तुल जप्त

FIR On Nikhil Wagle In Pune | पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारी सराईत गुन्हेगारांची टोळी मुंढवा पोलिसांकडून गजाआड; तलवार, कोयता, लोखंडी रॉड जप्त (Video)

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट