Pune Kondhwa Crime | ग्रुप सोडल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | ग्रुप सोडल्याच्या शुल्लक कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.19) कम्युनिटी सोसायटी, कोंढवा येथे घडला आहे. कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुदब्बीर मतिन पटेल (वय-19 रा. साईबाबानगर, कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Kondhwa Crime)

आफान मुबारक शेख (वय-19 रा. युनिटी पार्क समोर, कोंढवा), हुशी उर्फ अली हमजा (वय-21 रा. साईबाबा नगर, कोंढवा), साद इनामादार (वय-20 रा. आश्रफ नगर, कोंढवा) व एका अल्पवयीन मुलावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी कॅम्प येथे जात होता. त्यावेळी आरोपींनी तू आमचा ग्रुप का सोडला अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉड, लाकडी बांबूने पायावर, पाठीवर, डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करीत आहेत.

जुन्या वादातून वीटेने मारहाण

हडपसर : पैसे नसल्यामुळे दारु पाजण्यास नकार दिल्याने जुना वाद उकरुन काढत एका 49 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ
करुन वीटेने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मांजरी येथे घडला.
याप्रकरणी राजेश श्रीमंतराव निकम (वय-49 रा. महादेव नगर, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात
(Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शिवा शिंदे (रा. हडपसर), आतीश परदेशी (महादेव नगर, मांजरी),
सोमनाथ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे दारुची मागणी केली.
त्यावेळी त्यांनी पैसे नसल्याचे सांगून दारु पाजण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपींनी जुना वाद उकरुन काढत फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच हाताने व वीटेने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More On Pune Lok Sabha | ‘दोस्ती मध्ये कुस्ती झाली तरी ती नूरा होणार नाही, चितपट मारणार’ – वसंत मोरे (Video)

Pune Katraj Crime | पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण, कात्रज परिसरातील घटना