Pune Kondhwa Crime | रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे तोंड दाबून गैरवर्तन, आरोपीला अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून तिला किस करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास महंमदवाडी येथील विबग्योर स्कूलच्या समोर घडला. (Pune Kondhwa Crime)

याबाबत 20 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन भारतलाल रामप्रसाद कुलदीप वर्मा Bharatlal Ram Prasad Kuldeep Verma (वय-19 रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मंगळवारी रात्री विबग्योर स्कूलच्या समोरील रस्त्यावरुन पायी जात होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी थांबला होता. त्याने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

संपर्क करत नसल्याने मुलीची बदनामी

कोथरुड : ओळखीच्या तरुणासोबत मैत्री ठेवण्याची इच्छा नसताना देखील त्याने वारंवार वेगावगेळ्या माध्यमातून मुलीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलीच्या राहत्या घराखाली येऊन, पाठलाग करुन विनयभंग केला. तरुणी संपर्क करत नसल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिच्या मित्रमैत्रिणींकडे तिच्याबद्दल वाईट बोलून धमक्या दिल्या. तसेच तिची बदनामी केली. याप्रकरणी कोथरुड येथील 24 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओमकार अनिल आधवडे (वय-25 रा. कोथरुड) याच्यावर आयपीसी 354(ड), 500, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तो भोंदू महाराज, मनोज जरांगेंचा अरोप