Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | सोसायटीच्या पार्कींगमध्ये थांबलेल्या तरुणीला मिठी मारुन तिचा कीस (Kiss) घेऊन अश्लील वर्तन (Obscene Behavior) केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे (Pune Molestation Case). याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) 58 वर्षाच्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.27) दुपारी साडेतीन आणि गुरुवारी (दि.28) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला आहे. (An incident in Kondhwa area where a young woman was sexually assaulted)

याबाबत कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.29) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गुरविंदसिंग चव्हाण (अंदाजे वय 58 पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सोसायटीच्या पार्किंग मध्ये थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला मिठी मारुन कीस केला. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले (Crime Against Woman). पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डागोळे करीत आहेत. (Pune Kondhwa Crime)

कोंढवा परिसरातून शाळकरी मुलगी बेपत्ता

कोंढवा : शाळेत जाते असे सांगून घरातून गेलेल्या 15 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.
हा प्रकार 26 मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द
येथील मिठानगर येथे घडला आहे. याबाबत मुलीच्या बहिणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्य़ादी यांची बहिण शाळेत जाते असे सांगुन घरातून गेली. ती परत आली नसल्याने तिचा परिसरात शोध घेतला मात्र ति सापडली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास